पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएचडीसीसीआयच्या 14 व्या आंतरराष्ट्रीय वारसा पर्यटन संमेलनात लोकाभिमुख सांस्कृतिक पर्यटन आणि धोरणात्मक नवोपक्रमाचे आवाहन

Posted On: 26 JUL 2025 9:44AM by PIB Mumbai

 

गुजरातमध्ये वडोदरा  येथील  भव्य लक्ष्मी विलास पॅलेसच्या पार्श्वभूमीवर, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (पीएचडीसीसीआय) वतीने 25 जुलै 2025 रोजी 14 वे आंतरराष्ट्रीय वारसा पर्यटन संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे आयोजन भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय, गुजरात पर्यटन, दिल्ली पर्यटन, इंडिगो आणि आयआरसीटीसी यांच्या सहकार्याने करण्यात आले. ख़याल विरासत काया संकल्पनेवर आधारित हे संमेलन वारसा प्रेरित पर्यटनाच्या क्षेत्रात संवाद, कृती आणि जनजागृतीसाठी एक सजीव व्यासपीठ ठरले.

या संमेलनात धोरणकर्ते, राजघराण्यांचे प्रतिनिधी, मुत्सद्दी, संवर्धन वास्तुविशारद, पर्यटन व्यावसायिक, खाद्य इतिहासकार आणि सांस्कृतिक वारसा जपणारे शिलेदार यांचा एक मेळावा घेण्यात आला, ज्यात त्यांनी आर्थिक पुनरुज्जीवन, समुदाय विकास आणि सांस्कृतिक सातत्यासाठी भारताच्या समृद्ध वारशाचा वापर कसा करता येईल, यावर सखोल चर्चा केली.

वारशाचे जतन हे केवळ भूतकाळातील आठवणीपुरते मर्यादित नसून, ते पुढील पिढ्यांशी जुळले गेले पाहिजे, असे बडोद्याच्या राजघराण्याचे  महाराजा समरजीतसिंह गायकवाड यांनी याप्रसंगी अधोरेखित केले. भारत पर्यटन, मुंबई विभागाचे प्रादेशिक संचालक मोहम्मद फारूक यांनी पर्यटन मंत्रालयाच्या 'स्वदेश दर्शन 2.0' आणि 'प्रसाद' यासारख्या योजनांद्वारे स्थानिक खाद्यसंस्कृती, लोककथा, हस्तकला आणि सणांद्वारे पर्यटन स्थळांना परस्पर जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत असतांना पीएचडीसीसीआयच्या पर्यटन समितीचे सह-अध्यक्ष राजन सहगल म्हणाले की, वारसा पर्यटन हे ओळख, अर्थव्यवस्था आणि सक्षमीकरणाशी संबंधित आहे. धोरणात्मक नवकल्पना आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीला चालना देणे हा आमचा उद्देश आहे.

संमेलनाची सुरुवात महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर पीएचडीसीसीआय-केपीएमजी वारसा पर्यटन अहवालाचे प्रकाशन करण्यात आले, ज्यात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून वारसा स्थळांचे पुनरुज्जीवन करण्यावर भर देण्यात आला.

सत्रातील काही ठळक मुद्दे:

· वायब्रंट गुजरात मॉडेल: कारागिरांचा सहभाग आणि ऐतिहासिक वस्तूंच्या नवोपयोगासारख्या समुदाय-केंद्रित उपक्रमांवर चर्चा.

· शेखावती वारसा : खाजगी वारसा मालमत्ता धारकांसाठीच्या अडचणी आणि प्रोत्साहन योजना तसेच जीर्णोद्धाराची रूपरेषा.

· खाद्य पर्यटन: प्रा. पुष्पेश पंत आणि प्रसिद्ध शेफ्सच्या सहभागाने, अन्नसंस्कृती ही एक सांस्कृतिक वारशाची ठेव असून, अजूनही ती पर्यटनाच्या संदर्भात मर्यादित वापरात असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

· गुजराती पद्धतीचे दुपारचे पारंपरिक जेवण – 'बापोर नू भोजन': शेफ प्रतीश राऊत यांनी सादर केलेल्या या भोजनात गुजरातच्या खाद्य वारशाच्या कथा सांगण्यात आल्या.

· केस स्टडी चांपानेर-पावागड: डॉ. अमिता सिन्हा यांनी सादर केलेल्या या सत्रात समुदाय पर्यटन आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळाचे पुनरुज्जीवन करण्यावर भर.

· स्त्रिया सांस्कृतिक वारशाच्या संरक्षक:  राधिकाराजे गायकवाड आणि  कादंबरीदेवी  जाडेजा यांच्या सहभागाने महिलांनी चालवलेल्या पर्यटन उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

· वास्तुकला आणि आणि कथाकथन:  युवकांना वारसा स्थळांकडे आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आणि सर्वसमावेशक कथानकांचा वापर करण्याचा आग्रह.

· वारसा वाहतूक: जुनी वाहने ही पर्यटनासाठी आकर्षण ठरू शकतात, यावर चर्चा झाली आणि त्यासाठी जीर्णोद्धार अनुदानांची आवश्यकता व्यक्त्त करण्यात आली.

या संमेलनात पर्यटन मंडळे, आदरातिथ्य उद्योगातील प्रमुख, आणि सांस्कृतिक उद्योजक यांच्यातील पंचवीस पेक्षा जास्त व्यवसाय बैठकांचे आयोजन करण्यात आले, ज्याद्वारे विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींवर चर्चा झाली.

आजच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रवाहांशी सुसंगत कलाकृतींचे प्रदर्शन आणि लक्ष्मी विलास पॅलेसची मार्गदर्शित हेरिटेज वॉकने या संमेलनाचा समारोप झाला.

***

माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2148883)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil