अंतराळ विभाग
संसदेतील प्रश्न : गगनयान मिशन
Posted On:
23 JUL 2025 10:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2025
गगनयान कार्यक्रमाची सद्यःस्थिती आणि महत्त्वाचे टप्पे पुढील प्रमाणे:
1. नवीन घडामोडी
- ह्युमन रेटेड लाँच व्हेईकल (एचएलव्हीएम 3): विकास आणि जमिनीवरील चाचण्या पूर्ण.
- ऑर्बिटल मॉड्यूल: क्रू मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूलसाठी प्रोपल्शन सिस्टम विकसित आणि चाचणी केली गेली. ईसीएलएसएस अभियांत्रिकी मॉडेल साकार झाले.
- क्रू एस्केप सिस्टम (सीईएस): 5 प्रकारच्या मोटर्स विकसित आणि स्थिरता चाचणी.
- पायाभूत सुविधांची उभारणी: ऑर्बिटल मॉड्यूल तयारी सुविधा, गगनयान नियंत्रण केंद्र, गगनयान नियंत्रण सुविधा, क्रू प्रशिक्षण सुविधा, द्वितीय लाँच पॅड मध्ये सुधारणा.
- पूर्वगामी मोहिमा: टीव्ही-डी1 मध्ये चाचणी केलेले सीईएस आणि उड्डाण प्रमाणित करण्यासाठी विकसित केलेले चाचणी वाहन. टीव्ही-डी2 आणि आयएडीटी-01 साठीची प्रक्रिया प्रगतीपथावर.
- फ्लाइट ऑपरेशन्स अँड कम्युनिकेशन नेटवर्क: ग्राउंड नेटवर्क कॉन्फिगरेशनला अंतिम स्वरूप देण्यात आले. आयडीआरएसएस -1 फीडर स्टेशन आणि स्थलीय दुवे स्थापित केले.
- क्रू रिकव्हरी ऑपरेशन्स: रिकव्हरी ऍसेट्सला अंतिम स्वरूप देण्यात आले. रिकव्हरी प्लॅन तयार करण्यात आला.
2. पहिली मानवरहित मोहीम (जी 1): सी 32-जी स्टेज आणि सीईएस मोटर्स साकारले. एचएस 200 मोटर्स आणि सीईएस फोर क्रू मॉड्यूल जेटिसोनिंग मोटर स्टॅकसह पूर्ण. क्रू मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूल संरचना साकारली. क्रू मॉड्यूल फेज-1 तपासणी पूर्ण.
अवकाश संशोधन करणाऱ्या एका प्रस्थापित देशाच्या आकांक्षा पूर्ण करणे, हे मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. 'विकसित भारताच्या’ उद्दिष्टाच्या दिशेने विकसित होत असलेली तांत्रिक आणि उत्पादन क्षमता, राष्ट्रीय संशोधन आणि तंत्रज्ञान विकास परिप्रेक्ष्यातील परिवर्तानात्मक बदलांवर अवलंबून असेल. गगनयान कार्यक्रमांतर्गत मानवी अंतराळ उपक्रमांसाठी मूलभूत क्षमता सिद्ध केल्यानंतर, पुढली तार्किक पायरी म्हणजे दीर्घकालीन मानवी अंतराळ मोहिमांचा मार्ग खुला करण्यासाठी, पृथ्वीच्या कक्षेत खालच्या पातळीवर मानवी अधिवास किंवा अंतराळ स्थानकाचा विकास उपक्रम सुरू करणे, ही आहे. या संदर्भात, भारतीय मानवी अंतराळ कार्यक्रमाच्या दीर्घकालीन दृष्टीकोना अंतर्गत, 2035 साला पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची स्थापना (बीएएस) आणि 2040 पर्यंत भारतीय चंद्रावर उतरणे, याचा समावेश आहे.
2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची (बीएएस) पाच मॉड्यूल स्थापन करण्याची योजना असून त्यासाठी बीएएसचे पहिले मॉड्यूल विकसित करायला मंजुरी मिळाली आहे.
2040 पर्यंत चंद्रावर भारतीय उतरवण्याच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मोहिमेचे पैलू, प्रक्षेपण यानाची रचना आणि ऑर्बिटल मॉड्यूल प्रणाली ची कामे हाती घेण्यात आली आहेत.
सध्या सुरू असलेल्या गगनयान कार्यक्रमासाठी वाढीव प्रशिक्षण आणि चंद्रावर भारतीय व्यक्तीच्या प्रस्तावित लँडिंग यासह प्रशिक्षण मॉड्यूल मोहिमेच्या वेळापत्रकाच्या आवश्यकतेनुसार आहेत.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2147618)