संरक्षण मंत्रालय
भारताचा सागरविषयी दृष्टिकोन यावर नवी दिल्लीत होणार असलेल्या राष्ट्रीय परिषदेत 2047 मधील विकसित भारतासाठी परंपरा, संरक्षण आणि दूरदृष्टी यावर भर
Posted On:
23 JUL 2025 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2025
संयुक्त युद्धअभ्यास, एकात्मिक संरक्षण मुख्यालयाच्या तिन्ही सैन्य दलाच्या थिंक टॅंक यांनी संयुक्तपणे ‘भारताचा सागरविषयक’ दृष्टिकोन या विषयावर नवी दिल्लीत 24 आणि 25 जुलै 2025 या कालावधीत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालयाच्या आशियाई अभ्यासासाठीची मौलाना अब्दुल कलाम आझाद संस्था यांच्या सहभागाने आयोजित करण्यात आला आहे.
ही परिषद ‘संपूर्णपणे राष्ट्र’ या दृष्टिकोनाशी संलग्न असेल आणि धोरणात्मक, सांस्कृतिक तसेच विकासात्मक स्तरावरील संबंधितांना एकत्र आणत भारताच्या विकसित होत असलेल्या सागर विषयक प्रभावाचा शोध घेणे हा उद्देश यामागे आहे. या कार्यक्रमात संरक्षण, राजनैतिक, धोरण, विद्यापीठ स्तरावरील , औद्योगिक तसेच सांस्कृतिक संस्थांच्या एकत्रित क्रियाकलापांचे प्रतिबिंब दिसून येईल. आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्ती असा हॉलमार्क असलेला भारत निर्माणाकडे जाईल.
ही परिषद भारताच्या सागरी क्षेत्रातील प्रवासाचा वेध घेण्याच्या दृष्टीने आयोजित केली आहे. यामध्ये समुद्रावरील सफारींची पूर्वापार परंपरा आणि इतिहासकालीन बंदरांचे जाळे ते सद्यकालीन भारतीय प्रशांत समुद्रावरील आव्हाने तसेच संधी या सगळ्यांचाच वेध यात घेतला जाईल. यामधील सत्रे धोरणात्मक कनेक्टिव्हिटी, समुद्रावरील संरक्षण, आर्थिक बंध, नील अर्थव्यवस्था आणि किनाऱ्यावरील पायाभूत सुविधा तसेच प्रशासन यातून भारताच्या भविष्याला आकार या विषयांचा सविस्तर वेध घेतील.
या उपक्रमात अनेक उद्बोधक वक्ते सहभागी होतील यामध्ये भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी , अग्रगण्य विद्यापीठांमधील, सागरी संशोधन संस्थांमधील स्कॉलर्स तसेच नौवहन आणि बंदरे पायाभूत सुविधा क्षेत्राचे प्रतिनिधी, थिंक टॅंक मधील तज्ञ धोरणात्मक आणि धोरणसंबंधित संस्थांमधील तज्ञ तसेच सांस्कृतिक इतिहासकार आणि त्यावर काम करणारे तज्ञ अशा व्यक्ती असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत हे राष्ट्रीय उद्दिष्ट 2047 पर्यंत साध्य करण्यासाठी ही परिषद थेट सहभाग नोंदवणार आहे. भारताच्या शंभराव्या स्वातंत्र्यप्राप्ती वर्षात जागतिक सागरी शक्ती म्हणून उदयाला येण्याचे भारताचे उद्दिष्ट हे एकात्मिक विचार, शाश्वत धोरण , गुंतवणूक आणि नागरी -लष्करी -शैक्षणिक स्तरावरच्या एकत्रित सहभागातूनच साध्य होईल.
* * *
शैलेश पाटील/विजया सहजराव/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2147616)