भूविज्ञान मंत्रालय
संसदेतील प्रश्न : जलनिर्मितीसाठी पवनचक्की
Posted On:
23 JUL 2025 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2025
पवनचक्कीच्या सहाय्याने निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर करून हवेतील आर्द्रतेपासून पाणी निर्माण करता येईल. हे तंत्रज्ञान अद्याप बाल्यावस्थेत म्हणजेच संशोधन आणि विकास या टप्प्यावर आहे. या क्षेत्रातील योग्य प्रस्तावांचा विचार नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या नवीकरणीय ऊर्जा संशोधन आणि तंत्रज्ञान अंतर्गत केला जाईल. भूशास्त्र मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्थेने प्रायोगिक तत्त्वावर एयर कंडीशनर अधिक जल निर्मिती प्रणाली विकसित केली आहे. सामान्य एयरकंडीशनर सारखे काम करत असतानाच 100 लिटर पर्यंत ताजे पाणी निर्माण करण्याचे क्षमता असणारी ही प्रणाली आहे. हवा थंड करत असतानाच हवेत असलेल्या बाष्पाचे द्रवीभवन करून त्यातून पाणी निर्माण करता येते या तत्त्वावर ही प्रणाली चालते. पवनचक्कीपासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर प्रणाली काम करु शकते.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण , निवृत्तीवेतन , अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली.
* * *
शैलेश पाटील/विजया सहजराव/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2147615)