संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण सचिवांची नवी दिल्ली येथे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या महासंचालकांसोबत द्विपक्षीय बैठक

Posted On: 23 JUL 2025 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2025

 

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांची 23 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल (रेस) आमीर बाराम यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली. दीर्घकालीन दृष्टिकोनानुसार द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी संस्थात्मक चौकट विकसित करण्याच्या दिशेने काम करण्यास त्यांनी अनुकूलता दर्शविली.

इस्रायलच्या महासंचालकांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईला पूर्ण पाठिंबा दर्शवला. संरक्षण सचिवांनी दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या भारताच्या धोरणाचा पुनरुच्चार केला. तसेच 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आणि सर्व ओलिसांची सुटका करण्याचे आवाहन केले.

   

जुलै 2024 मध्ये भारतात झालेल्या संयुक्त कार्यगटाच्या अंतिम बैठकीपासून सुरू असलेल्या संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचाही दोन्ही बाजूंनी आढावा घेतला.

इस्रायल संरक्षण महासंचालकांचा हा दौरा म्हणजे भारत-इस्रायल संरक्षण संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा असून तो धोरणात्मक भागीदारी वाढविण्याच्या उभय बाजूंच्या वचनबद्धतेला बळकटी देतो.

 

* * *

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2147609)
Read this release in: English , Urdu , Hindi