अंतराळ विभाग
संसद प्रश्न: भारतीय उपग्रहसमूहाच्या (नाविक) सहाय्याने दिक्चालन
Posted On:
23 JUL 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2025
सुमारे 12,000 रेल्वेगाड्यांचा वेध नाविक आणि इतर जीएनएसएस उपग्रहसमूहाचा वापर करून वास्तविक वेळेत घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
हे देखील खरे आहे की सुमारे 8,700 गाड्या आधीच नाविक आणि इतर जीएनएसएस उपग्रहसमूहाने सुसज्ज आहेत.
आतापर्यंत 11 उपग्रह कक्षेत ठेवण्यात आले असून त्यापैकी काही कार्यरत नाहीत. सध्या 4 उपग्रह स्थान, दिक्चालन आणि वेळ (पीएनटी) सेवा प्रदान करत आहेत, 4 उपग्रह एकेरी संदेश प्रसारणासाठी वापरले जात आहेत तर 1 उपग्रह त्याच्या आयुष्याच्या समाप्तीनंतर निकामी झाला आहे. 2 उपग्रह इच्छित कक्षेत पोहोचू शकले नाहीत.
एनव्हीएस-03 उपग्रहाचे 2025 च्या अखेरीपर्यंत प्रक्षेपण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर, सहा-सहा महिन्यांच्या अंतराने एनव्हीएस-04आणि एनव्हीएस-05 चे प्रक्षेपण करण्याचे नियोजन आहे.
ही माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
* * *
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2147494)