आयुष मंत्रालय
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने सीक्रास-प्रयत्न या आपल्या दुसऱ्या वैज्ञानिक लेखन कार्यशाळेच्या केली घोषणा
सीक्रासने या प्रयत्न कार्यशाळा 2025-26: यासाठी स्वारस्य असलेल्या आयुर्वेद संस्थांकडून 15 ऑगस्टपर्यंत अर्ज (EOI) मागवले आहेत
Posted On:
23 JUL 2025 3:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2025
आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (CCRAS) त्यांचा प्रमुख उपक्रम, सीक्रास-प्रयत्न याअंतर्गत (CCRAS-PRAYATNA) - त्यांच्या दुसऱ्या वैज्ञानिक लेखन कार्यशाळेची घोषणा केली आहे;या कार्यशाळेचा उद्देश पदव्युत्तर आयुर्वेदिक तज्ञ, पीएच.डी.आणि पोस्ट-डॉक्टरेटल तज्ञांना; वैज्ञानिक लेखन, हस्तलिखित विकास आणि संशोधन प्रकाशनातील विविध कौशल्यांची माहिती देऊन त्यासाठी प्रशिक्षित करणे हा आहे.
या उपक्रमाविषयी आपले विचार मांडताना, सीसीआरएएसचे महासंचालक प्रा. रबीनारायण आचार्य यांनी तरुण आयुर्वेद संशोधकांना आपल्या वैज्ञानिक लेखन क्षमतांचा उत्तमप्रकारे विकास करून सक्षम बनवण्याच्या महत्त्वावर भर दिला.
“सीसीआरएएस-प्रयत्न हा उपक्रम उच्च-गुणवत्तेच्या वैज्ञानिक प्रकाशनासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांसह तरुण विद्वानांना सक्षम करून आयुर्वेदातील एक समर्थ संशोधन संस्कृती जोपासण्याच्या आमच्या अटळ वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते,असे ही त्यांनी यावेळी नमूद केले.
प्रत्यक्ष प्रशिक्षण, तज्ञ मार्गदर्शन आणि सुयोग्य मार्गदर्शनाद्वारे, प्रयत्न उपक्रमाच्या माध्यमातून पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अशा विद्वानांना जागतिक मानकांप्रमाणे त्यांचे संशोधन प्रभावीपणे सर्वत्र पोहोचविण्यासाठी सुसज्ज करत आहे.”
ऑगस्ट 2024 पासून सुरू केलेली,प्रार्थना ही प्रशिक्षण कार्यशाळेची मालिका शैक्षणिक संशोधन आणि जागतिक प्रकाशन मानकांमधील अंतर भरून काढत आयुर्वेदामधील संशोधन परिसंस्था मजबूत करण्याचा एक अग्रगण्य प्रयत्न आहे. या उपक्रमात तज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि समवयस्क-पुनरावलोकन आणि अभिप्राय इत्यादी विषय समाविष्ट आहेत जेणेकरून तरुण आयुर्वेदिक तज्ञ त्यांचे प्रबंध कार्याचे उच्च-गुणवत्तेच्या, प्रकाशित करण्यायोग्य लेखांमध्ये रूपांतरित करू शकतील.
या कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे वैज्ञानिक लेखन क्षमता निर्माण करणे, संशोधनाची दृश्यमानता वाढवणे आणि प्रकाशनांची तयारी सुधारणे, ज्यामुळे आयुर्वेद जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त पुराव्यांचा आधारासह आपले संशोधन सिध्द करुन त्यांचा दर्जा निर्माण होण्यास हातभार लागेल.
बेळगाव येथील श्री बीएमके केएलई आयुर्वेद महाविद्यालयात झालेल्या पहिल्या कार्यशाळेच्या घवघवीत यशानंतर, अनेक हस्तलिखिते शोध निबांधांच्या रुपात विकसित करण्यात येऊन आणि ती नामांकित जर्नल्समध्ये सादर करण्यात आली होती.
2025-26 वर्षातील दुसऱ्या कार्यशाळेचे ठिकाण राष्ट्रीय स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) प्रक्रियेद्वारे निवडलेल्या संस्थांमध्ये आयोजित केले जाईल.
हा कार्यक्रम बहुस्तरीय संरचनेचे अनुसरण करेल, ज्यामध्ये जागरूकता वेबिनार, लेखांचे पुनरावलोकन आणि निवासी प्राचीन हस्तलिखित विकास कार्यशाळा यांचा समावेश असेल, ज्यामुळे सखोल सहभाग आणि निष्कर्ष-चलित प्रशिक्षण सुनिश्चित होईल.
इच्छुक आयुर्वेद संस्था 15ऑगस्ट 2025 पर्यंत ccrasprayatna[at]gmail[dot]com वर स्वारस्याची अभिव्यक्ती (EOI) सादर करून आगामी प्रयत्न कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी अर्ज करू शकतात.
पुराव्यावर आधारित आयुर्वेदाला गतीशील करण्यात आघाडीवर असलेल्या सीसीआरएएसने विविध प्रभावी उपक्रमांद्वारे संशोधन आणि शैक्षणिक क्षमता सक्षम करणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या प्रतिष्ठित संशोधन पत्रिका- जर्नल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस (जेआरएएस), जर्नल ऑफ ड्रग रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस (जेडीआरएएस) आणि जर्नल ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज (जेआयएमएच) - यांनी आयुर्वेदातील शिष्यवृत्तीसाठी जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. प्रयत्न या कार्यशाळेच्या मालिकांसह वैज्ञानिक लेखन कार्यशाळा -हा या संस्थेचा एक महत्त्वाचा घटक असून, हस्तलिखित गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रकाशनांना परिणामांना चालना देण्यासाठी क्लिनिकल, औषध आणि साहित्यिक संशोधनात केंद्रित, टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देतात.
* * *
जयदेवी पीएस/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2147299)