ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘मनरेगा’अंतर्गत महिला श्रमिकांना मिळालेल्या रोजगाराची माहिती

Posted On: 22 JUL 2025 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2025

 

‘मनरेगा’ म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या अंतर्गत महिलांना रोजगार मिळावा, यासाठी विशेष तरतुदी आहेत. या कायद्याच्या परिशिष्‍ट -2, परिच्छेद 15 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की,  रोजगार प्रदान करताना, महिलांना अशा रीतीने प्राधान्य देण्यात येईल की लाभार्थ्यांपैकी किमान एक तृतीयांश महिला असतील.  ज्या महिलांनी मनरेगा  योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे आणि कामाची मागणी केली आहे, त्यांना रोजगार दिला जाईल.

गेल्या पाच आर्थिक वर्षांत या योजनेअंतर्गत महिलांचा सहभाग सातत्याने 50% पेक्षा जास्त आहे. आर्थिक वर्ष 2013-14  मध्ये 48 % महिलांचा सहभाग होता. त्यामध्ये  आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत महिलांचा सहभाग 58.1 %  पर्यंत वाढला आहे.

मनरेगा अंतर्गत महिला कामगारांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना तात्पुरत्या हंगामी /बैठ्या नोकऱ्या देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. तथापि, महिला कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेअंतर्गत अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

महिला, वृद्ध, अपंग आणि दुर्बल, आजारी असलेल्या लोकांसाठी उत्पादक कामाद्वारे त्यांचा सहभाग सुधारण्यासाठी स्वतंत्र दर वेळापत्रक अंतिम केले जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, अशी तरतूद करण्यात आली आहे की, कामाच्या ठिकाणी शक्यतो स्वयं-सहाय्यता गटांच्या (एसएचजी) सदस्यांपैकी पर्यवेक्षक (सोबती) किमान 50 टक्के महिला असाव्यात.  

आज लोकसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्‍ट्रामध्‍ये आर्थिक वर्ष 2024-25 मध्‍ये 22.9 लाख महिला मनरेगा अंतर्गत कार्यरत आहेत. तर त्याआधीच्या म्हणजे वर्ष 2023-24 या वर्षामध्‍ये 18.1 लाख महिलांना रोजगार मिळाला. आणि वर्ष 22-23 मध्‍ये 16.5 लाख महिलांना कार्यरत होत्या.

(गेल्या तीन आर्थिक वर्षात मनरेगा  अंतर्गत रोजगार मिळविलेल्या महिला कामगारांची राज्य/केंद्रशासित प्रदेश (यूटी) निहाय संख्या परिशिष्टात दिली आहे.)

ही माहिती ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

Annexure

State/Union Territory (UT)-wise number of women workers who availed of employment under Mahatma Gandhi NREGS during the last three financial years. (Figure in lakh)

Sl. No.

States/UTs

2024-25

2023-24

2022-23

1

Andhra Pradesh

42.0

41.9

41.9

2

Arunachal Pradesh

1.5

1.3

1.3

3

Assam

14.2

17.0

17.0

4

Bihar

30.9

29.0

31.0

5

Chhattisgarh

23.7

23.4

24.7

6

Goa

0.0

0.0

0.0

7

Gujarat

6.3

7.3

7.9

8

Haryana

2.9

3.1

2.5

9

Himachal Pradesh

6.1

5.7

5.3

10

Jammu and Kashmir

3.8

3.5

3.3

11

Jharkhand

11.4

12.3

12.0

12

Karnataka

26.9

27.7

27.0

13

Kerala

12.8

13.9

14.7

14

Ladakh

0.2

0.2

0.2

15

Madhya Pradesh

26.4

28.6

33.0

16

Maharashtra

22.9

18.1

16.5

17

Manipur

3.2

2.7

2.0

18

Meghalaya

3.4

3.7

3.5

19

Mizoram

1.1

1.1

1.1

20

Nagaland

1.1

2.1

2.1

21

Odisha

16.5

24.2

24.6

22

Punjab

6.6

6.7

6.6

23

Rajasthan

50.0

55.0

55.1

24

Sikkim

0.4

0.4

0.4

25

Tamil Nadu

62.0

65.6

62.6

26

Telangana

24.9

23.6

26.0

27

Tripura

4.1

4.2

4.1

28

Uttar Pradesh

31.8

33.4

32.3

29

Uttarakhand

3.3

3.7

3.9

30

West Bengal

0.0

0.0

9.8

31

Andaman and Nicobar

0.0

0.0

0.0

32

Dadra and Nagar Haveli and Daman and Diu

0.1

0.0

0.0

33

Lakshadweep

0.0

0.0

0.0

34

Puducherry

0.4

0.5

0.4

 

Total

440.7

459.8

473.0

(As per NREGASoft)

 

* * *

निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2147078)
Read this release in: English , Urdu , Hindi