संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दल आणि कोरियाचे तटरक्षक दल यांच्यातील 13 वी उच्च-स्तरीय बैठक नवी दिल्ली येथे संपन्न
Posted On:
21 JUL 2025 8:54PM by PIB Mumbai
आज, दिनांक 21 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि कोरियाचे तटरक्षक दल (केसीजी) यांच्यातील 13 वी उच्च-स्तरीय बैठक पार पडली. दोन्ही देशांच्या तटरक्षक दलांनी 2006 मध्ये झालेल्या सामंजस्य कराराला अनुसरुन सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याप्रती तसेच आंतरपरिचालन सुधारण्याप्रती आपापल्या कटिबद्धतेला बळकटी देत, सागरी शोध तसेच बचाव (एसएआर), प्रदूषणाप्रती प्रतिसाद(पीआर) तसेच सागरी कायद्यांची अंमलबजावणी (एमएलई) यांच्या संदर्भात सहकार्याला चालना देण्यासाठी विचारविनिमय केला.
आयसीजीचे महासंचालक एस परमेश आणि 20 ते 24 जुलै, 2025 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आलेल्या पाच सदस्यांच्या कोरियन प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणारे केसीजीचे महाआयुक्त किम याँग जिन यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. या भारत भेटीचा भाग म्हणून, सागरी औद्योगिक तसेच परिचालनात्मक बंध मजबूत करण्याच्या उद्देशाने केसीजीचे प्रतिनिधीमंडळ माझगाव गोदी जहाजबांधणी कंपनीला (एमडीएल) औद्योगिक भेट देण्यासाठी 23 आणि 24 जुलै रोजी मुंबईला येणार असून यावेळी हे पथक आयसीजीच्या गस्ती जहाजाला देखील भेट देणार आहे.
MR9A.jpg)
KM3I.jpg)
I2F0.jpg)
***
JaydeviPS/SanjanaChitnis/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2146686)