जलशक्ती मंत्रालय
जल जीवन मोहिमेअंतर्गत तपासणी
Posted On:
21 JUL 2025 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2025
भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) जल जीवन मिशन (JJM) योजनांच्या थेट प्रत्यक्ष तपासणीसाठी केंद्रीय नोडल अधिकारी (CNOs) नियुक्त केले आहेत. केंद्रीय नोडल अधिकाऱ्यांनी आतापर्यंत भेट दिलेल्या जिल्ह्यांची यादी खाली दिली आहे.
कोविड 19 महामारी आणि रशिया युक्रेन संघर्ष यांमुळे कच्च्या मालाची किंमत वाढल्याने विविध राज्यांनी या अतिरिक्त किंमतीचा मेळ घालण्यासाठी केंद्रीय सहाय्याची केलेली मागणी लक्षात घेता, जल जीवन मोहिमेच्या कालावधीत अंमलबजावणीची गती कायम ठेवण्यासाठी 21.06.2022 पासून मोहिमेच्या कार्यकारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.
जल जीवन अभियानाची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केन्द्र सरकार संबंधित राज्य सरकारांच्या साहाय्याने नियमितपणे आढावा घेत असते. आढावा बैठका आणि विद्याशाखीय पथकांच्या भेटींच्या माध्यमातून ज्या क्षेत्रांमध्ये अंमलबजावणी आणि देखरेख अधिक काटेकोर करणे आवश्यक आहे ते अधोरेखित केले जाते.
केंद्रीय नोडल अधिकाऱ्यांनी आतापर्यंत देशभरात विविध जिल्ह्यांना भेट देवून, योजनेची पाहणी केली. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पुढील जिल्ह्यांना भेट दिली.
गोवा - उत्तर गोवा
महाराष्ट्र - छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड.
यासंबंधीची माहिती जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2146418)