वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जागतिक बाजारात संधी मिळवून देण्याच्या साधनांसह भारतीय निर्यातदारांना सक्षम करण्यासाठी आयआयजीएफ आणि टॉय बिझ इंटरनॅशनल एक्स्पोमध्ये ट्रेड कनेक्ट ई-व्यासपीठाचे प्रात्यक्षिक केले सादर
Posted On:
17 JUL 2025 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2025
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) ट्रेड कनेक्ट व्यासपीठाबाबत जनजागृती आणि सहभाग वाढवण्यासाठी जुलै महिन्यात 71वा भारत आंतरराष्ट्रीय परिधान मेळा आणि 16 वा टॉय बिझ इंटरनॅशनल बी टू बी एक्स्पो 2025 या दोन प्रमुख व्यवसाय ते व्यवसाय (बीटूबी) प्रदर्शनांमध्ये भाग घेतला.
केंद्रीय वस्त्रोद्योग आणि परराष्ट्र राज्य मंत्री पवित्रा मार्गेरिटा यांनी 01 जुलै 2025 रोजी नवी दिल्लीत यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे 71व्या भारत आंतरराष्ट्रीय परिधान मेळाव्याचे उद्घाटन केले. या नामांकित मेळाव्यात 360 पेक्षा अधिक भारतीय प्रदर्शकांनी इंग्लंड, स्पेन, ग्रीस, इटली, फ्रान्स आणि जर्मनीसह 79 देशांतील खरेदीदारांसमोर आपली उत्पादने सादर केली. त्यांनी ट्रेड कनेक्ट दालनाला भेट देऊन या व्यासपीठाच्या सेवा आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) निर्यातदारांना दिल्या जाणाऱ्या मदतीचे कौतुक केले.
डीजीएफटी ने 4 ते 7 जुलै 2025 दरम्यान टॉय असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आयोजित 16व्या टॉय बिझ इंटरनॅशनल एक्स्पोमध्ये सहभाग घेतला. 400 हून अधिक भारतीय ब्रँड्सच्या उपस्थितीत ‘ट्रेड कनेक्ट’ व्यासपीठाचे थेट प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. निर्यातकांना विश्वासार्ह व्यापार माहिती मिळवणे, प्रमाणित आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संपर्क साधणे आणि जागतिक बाजारपेठेत सुलभ प्रवेश मिळवणे या संबंधी माहिती यामध्ये देण्यात आली.
‘ट्रेड कनेक्ट’ पुढील महिन्यांत नवी दिल्लीतील वर्ल्ड फूड इंडिया 2025 व मुंबईतील इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो मध्येही सहभाग घेणार आहे, जेणेकरून निर्यातदार आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी थेट संपर्क राखता येईल.
ट्रेड कनेक्ट ई-व्यासपीठाची माहिती:
परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) चा हा एक महत्त्वपूर्ण डिजिटल पुढाकार असून, सर्व हितधारकांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार माहिती व सेवांचे एक समग्र केंद्र म्हणून कार्य करते.यामध्ये भारतीय दूतावास, निर्यात संवर्धन परिषदा, वस्तू मंडळे, वाणिज्य विभाग, डीजीएफटी अधिकारी आणि इतर संस्थांचा समावेश आहे.
हे व्यासपीठ एमएसएमई निर्यातकांना शुल्क (टॅरिफ), प्रमाणन, व्यापार प्रदर्शन, ई-कॉमर्स आणि खरेदीदारांसंबंधी अद्ययावत माहिती सुलभतेने पुरवते. निर्यात प्रक्रियेबद्दल माहिती देणारे इंटरॲक्टिव अभ्यासक्रमही विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
निर्यातदार https://trade.gov.in या संकेतस्थळावरून ‘ट्रेड कनेक्ट’चा वापर करू शकतात.
निलीमा चितळे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2145596)
Visitor Counter : 2