वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट" (ओडीओपी) योजनेअंतर्गत नवख्या निर्यातदारांना आणि नव्या बाजारपेठांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल

Posted On: 14 JUL 2025 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2025

 

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (ODOP-एक जिल्हा एक उत्पादन) पुरस्कार 2024 सोहळ्यात उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की वाणिज्य मंत्रालय देशातील जिल्ह्यांसोबत  काम करून नवख्या निर्यातदारांना नव्या बाजारपेठांमध्ये पोहोचवण्यासाठी काम करेल. गोयल यांनी जाहीर केले की नवीन बाजारपेठा, नवीन उत्पादने आणि नवखे निर्यातदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच मंत्रालय नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. त्यांनी नमूद केले की वाणिज्य मंत्रालय आणि जिल्हे एकत्रितपणे काम करून ओडीओपी उत्पादने नव्या बाजारांमध्ये पोहोचवू शकतात आणि नवख्या निर्यातदारांना भक्कम आधार देऊ शकतात.

गोयल यांनी भारताच्या यशोगाथेत देशभरातील 773 जिल्ह्यांचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत भारत हा वाळवंटातील मरूद्यानासारखा देश आहे आणि जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. 2027 पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्ये, जनता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच ही प्रगती शक्य झाली आहे. भारताकडे इतकी विविध उत्पादने आहेत की ती संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावू शकतात, असे ते म्हणाले. त्यांनी वायनाडची कॉफी, रत्नागिरीचे हापूस आंबे, पुलवामातील केशर ही उदाहरणे देत सांगितले की ही उत्पादने भारताच्या समृद्धतेचे प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक स्तरावर भारताला ओळख मिळवून देऊ शकतात.

ओडीओपी ही एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अशी एकमेव योजना आहे. जगात कोणत्याही इतर देशाकडे अशी योजना नाही. प्रत्येक जिल्ह्याची एक विशिष्ट परंपरा आणि ओळख आहे. काही वेळा एखाद्या जिल्ह्यांतून दोन उत्पादनेही ओळखली जातात, असे त्यांनी नमूद केले. स्थानिक आता जागतिक होत आहे, असे गोयल म्हणाले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या योजनेला लाभलेली उत्स्फूर्त प्रतिसादाची झलक ओडीओपी पुरस्कारांमध्ये दिसून आली. 1 एप्रिल ते 11 जून 2024 या कालावधीत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर एकूण 641 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये 587 अर्ज जिल्ह्यांकडून, 31 अर्ज राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून आणि 23 अर्ज परदेशातील भारतीय दूतावासांकडून  प्राप्त झाले. एकूण 34 पुरस्कार जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास  अशा तीन गटांमध्ये देण्यात आले. परदेशातील भारतीय दूतावास  या समारंभात दूरदृश्य माध्यमातून सहभागी झाली.

राज्यांच्या 'अ' श्रेणीत महाराष्ट्राने आंध्र, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह सुवर्ण पदक पटकावले.  

ओडीओपी पुरस्कार 2024 च्या विजेत्यांची यादी

  1. Indian Missions Abroad:

Mission Abroad

Award

High Commission of India Singapore

Gold

Consulate General of India, New York

Silver

Consulate General of India, Vancouver

Bronze

 

  1. States/UTs:
  1. Category A:

Rank

State/UT

Award

1

Andhra Pradesh

Gold

Maharashtra

Punjab

Uttar Pradesh

2

Madhya Pradesh

Silver

3

Gujarat

Bronze

Rajasthan

West Bengal

 

  1. Category B:

Rank

State/UT

Award

1

Jammu and Kashmir

Gold

2

Sikkim

Silver

3

Meghalaya

Bronze

Ladakh

 

  1. Districts:
  1. Category A – Agriculture:

Rank

District

State/UT

Product

Award

1

Guntur

Andhra Pradesh

Chillies

Gold

Ratnagiri

Maharashtra

Alphonso Mangoes

2

Nagpur

Maharashtra

Nagpur Orange

Silver

Pulwama

Jammu and Kashmir

Saffron

3

Siddharthnagar

Uttar Pradesh

Kala namak rice

Bronze

Amravati

Maharashtra

Mandarin Orange

Srikakulam

Andhra Pradesh

Cashew

4

Nalbari

Assam

Rice & rice products

Special Mention

Wayanad

Kerala

Coffee

Nashik

Maharashtra

Grapes/Raisins

 

  1. Category B – Non-Agriculture:

Rank

District

State/UT

Product

Award

1

Bapatla

Andhra Pradesh

Chirala Silk Sarees (Kuppadam)

Gold

Vizianagaram

Andhra Pradesh

Bobilli Veena

Tirupati

Andhra Pradesh

Venkatagiri Cotton Sarees

2

Sri Sathya Sai

Andhra Pradesh

Dharmavaram Silk Sarees

Silver

Ganderbal

Jammu and Kashmir

Willow Wicker

3

Anakapalli

Andhra Pradesh

Etikoppaka Toys

Bronze

Kakinada

Andhra Pradesh

Peddapuram Silks

4

Akola

Maharashtra

Cotton Ginning and pressing

Special Mention

West Godavari

Andhra Pradesh

Narspur Crochet Laces

 

* * *

S.Kakade/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2144720)
Read this release in: English , Urdu , Hindi