सांस्कृतिक मंत्रालय
भारतीय हस्तलिखितांचा वैभवशाली ठेवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर, सांस्कृतिक मंत्रालयाने केली भारताच्या हस्तलिखित वारशावर पहिल्या जागतिक परिषदेची घोषणा
Posted On:
10 JUL 2025 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2025
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान आणि भारताच्या हस्तलिखित संपत्तीतील संस्कृतीचा प्रवाहाला नवचैतन्य देण्याच्या वचनबद्धतेवर कृती करत, ‘हस्तलिखिताच्या वारशामार्गे भारतीय ज्ञान वारशाची पुनःप्राप्ती’ या विषयावर प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषदेची घोषणा केली आहे. ही परिषद 11 ते 13 सप्टेंबर 2025 या कालावधीत भारत मंडपम, नवी दिल्ली इथे होणार आहे.
भारताच्या हस्तलिखित वारशावर आधारित ही पहिली परिषद प्रत्यक्ष उपस्थिती आणि ऑनलाइन सहभाग अशा मिश्रित प्रकारे होईल. स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म संसदेत दिलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ 11 सप्टेंबर रोजी या परिषदेची सुरुवात केली जाणार आहे. त्या ऐतिहासिक प्रसंगाने भारताच्या ज्ञान, शांती व सार्वत्रिक सौहार्द विषयीच्या दृढ बांधिलकीस प्रेरणा दिली आणि भारताच्या बौद्धिक व आध्यात्मिक दृष्टीकोनाची जाणीव निर्माण केली. या परिषदेतील प्रमुख सत्रांमध्ये भारतासह जगभरातील विद्वान, विचारवंत आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मान्यवरांचा सहभाग असेल. परिषदेच्या मिश्रित आयोजनामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरून व्यापक सहभाग शक्य होणार आहे.
भारताकडे तत्त्वज्ञान, विज्ञान, वैद्यक, गणित, साहित्य, रूढी आणि कला यांसारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा अतुलनीय ठेवा आहे. ही हस्तलिखिते केवळ ऐतिहासिक नोंदी नसून त्यात भारतीय ज्ञान परंपरेचे सार आहे. भारतीय बौद्धिक व सांस्कृतिक वारशाचा अखंड प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहेत.
या तीन दिवसीय परिषदेत 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार असून, यामध्ये भारतासह इतर देशांतील 75 प्रतिष्ठित विद्वान व सांस्कृतिक ठेवा जतन करणाऱ्यांचा समावेश आहे.
सादरीकरणासाठी हस्तलिखित परंपराविषयक अभ्यासांवर आधारित नवे संशोधन निबंध, अभ्यास, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत स्वागतार्ह आहेत. यामध्ये संवर्धन, कोडिकोलॉजी, कायदेशीर चौकट, शिक्षण, सांस्कृतिक राजनीती आणि तंत्रज्ञानातील नवोन्मेष या विषयांचा समावेश आहे.
सारांश पाठविण्याची अंतिम तारीख: 10 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ: https://gbm-moc.in
संपूर्ण संशोधन निबंध पाठविण्यासाठी व अधिक चौकशीसाठी ईमेल:
gbmconference[at]gmail[dot]com
***
N.Chitale/R.Bedekar/P.Malndkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143902)
Visitor Counter : 7