अल्पसंख्यांक मंत्रालय
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रधान मंत्री जन विकास कार्यक्रम प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठ प्रतिनिधींसोबत सक्षम समितीची 48 वी बैठक
Posted On:
08 JUL 2025 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2025
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज देशभरातील विविध विद्यापीठांच्या प्रतिनिधींसह सक्षम समितीची 48 बैठक आज झाली.
या बैठकीत दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ आणि देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर या विद्यापीठांचे या प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रधान मंत्री जन विकास कार्यक्रम (पीएमजेव्हीके) अंतर्गत विविध प्रकल्प प्रस्तावांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
चर्चेच्या केंद्रस्थानी अल्पसंख्याक समुदायांच्या विविध भाषा आणि अभ्यासक्रमांसाठी उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणे आणि पायाभूत सुविधांचा विकास हे मुद्दे होते. यात अवेस्ता, पहलवी, प्राकृत, पाली, गुरुमुखी आणि बौद्ध अभ्यास यांचा समावेश होता, तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावांचाही विचार करण्यात आला.
पीएमजेव्हीके ही केंद्र पुरस्कृत योजना क्षेत्रीय विकासासाठी आहे. याअंतर्गत निवडक भागांमध्ये समुदायांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि मूलभूत सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
S.Bedekar/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143580)