कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
तक्रार निवारणाची प्रकरणे केवळ निकाली काढण्याऐवजी नागरिकांचे समाधान सुनिश्चित करण्याची गरज : डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
तक्रार निवारण संख्या दोन लाखांपासून 26 लाखांवर : नागरिकांचे सरकारशी पुनश्च जोडले गेले नाते, डॉ.जितेंद्र सिंह
Posted On:
09 JUL 2025 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2025
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सार्वजनिक तक्रारी हाताळण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करण्याचे आवाहन केले. नागरिकांचे समाधान सुनिश्चित करण्यासाठी तक्रार निवारण हे केवळ निकालापुरतेच न ठेवता त्याने नागरिकांचे समाधान झाले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

तक्रार निवारण हे पद्धतशीरपणे सुधारणा करण्याचे काम हे जीवनमान सुलभ करण्यासाठी असलेले एक साधन बनले पाहिजे,अशी अपेक्षा मंत्री डॉ. सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.
"सार्वजनिक तक्रारींचे प्रभावी निवारण, नेक्स्ट जेन सीपीग्राम्स(NextGen CPGRAMS) आणि प्रगतीचा आढावा" या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, की सरकारी अधिकाऱ्यांनी तक्रारींकडे, धोरणांमधील आणि प्रशासकीय नियमांमधील त्रुटी ओळखण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे.

"आता दरवर्षी 26 लाखांहून अधिक तक्रारी दाखल केल्या जातात. ही बाब यंत्रणेच्या प्रतिसादावर जनतेने दाखविलेल्या विश्वासाच्या परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे," असे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासनासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना त्यांनी या बदलाचे श्रेय दिले.

भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्थेच्या सुप्रतिष्ठित टी एन चतुर्वेदी सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यशाळेसाठी भारतभरातील सचिव, मुख्य सचिव, प्रशिक्षण संस्था प्रमुख आणि तक्रार अधिकारी असे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.डीएआरपीजीने आयोजित केलेल्या या कार्यशाळेने प्रशासन अधिक जबाबदार, डेटा-केंद्रित आणि नागरिकांना-प्रथम प्राधान्य देणारे होण्यासाठी सतत प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही दिली.
S.Bedekar/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143490)