अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हज आढावा बैठकीचे भूषविले अध्यक्षस्थान

Posted On: 04 JUL 2025 8:42PM by PIB Mumbai

 

हज 2025 प्रचंड यशस्वी यात्रा ठरली आहे,” असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित हज आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना नमूद केले.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या यात्रेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या खूपच कमी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हे सर्व संबंधित मंत्रालयांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे शक्य झाले आहे, असे ते म्हणाले.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या या आढावा बैठकीत हज 2025 च्या निष्पत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि हज 2026 चा मार्गक्रम निश्चित करण्यासाठी प्रमुख भागधारकांना एकत्र आणले होते.

आपल्या सुरुवातीच्या भाषणात रिजिजू यांनी भारतीय यात्रेकरूंना सुरळीत आणि आरामदायी अनुभव देण्याच्या आंतर-मंत्रालयीन अनुकरणीय समन्वयाचे कौतुक केले. यात्रेकरूंना लाभलेल्या उच्च समाधानाचे श्रेय त्यांनी भारत सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणांच्या मालिकांना आणि परिणामी, सुधारित सेवांना दिले. यामध्ये 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि मेहरम नसलेल्या महिलांसाठी (एलडब्ल्यूएम) अनिवार्य साथीदार, 60 वर्षे आणि त्यावरील यात्रेकरूंसाठी अनिवार्य आरोग्य तपासणी आणि प्रत्यक्ष मदत सुनिश्चित करण्यासाठी1: 150 च्या प्रमाणात राज्य हज निरीक्षक (एस एच आय) तैनात करणे यांचा समावेश होता.

प्रमुख विषयसूचींमध्ये 2026 साठी भारताच्या अपेक्षित कोट्यावरील चर्चा समाविष्ट होती, जो सौदी अरेबिया 14 जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. सौदीच्या निर्देशांनुसार, 12 वर्षांखालील मुले 2026 च्या हज यात्रेसाठी पात्र राहणार नाहीत तर ज्येष्ठ नागरिक ( 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे) आणि पुरुष सोबत्याशिवाय प्रवास करणाऱ्या महिलांना (45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या) प्राधान्य मिळत राहील.

सौदी अरेबियाने हज 2026 ची समयरेखा जवळ आणल्याने रिजिजू यांनी सर्व संबंधित मंत्रालये आणि विभागांना जलदगतीने तयारी करण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही सांगितले की, भारतीय हज समिती येत्या आठवड्यात भारतीय यात्रेकरूंसाठी हज 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा आहे.

चर्चेत आलेल्या नवीन प्रस्तावांमध्ये निवडक प्रवास बिंदूंवर मर्यादित संख्येतील यात्रेकरूंसाठी कमी कालावधीचे ( 20 दिवसांचे) हज पॅकेज सादर करण्याचा समावेश होता, जे दीर्घ मानक प्रवास कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नसलेल्या कार्यबहुल व्यावसायिकांना सामावून घेण्यासाठी आरेखित केले आहे.

***

S.Kane/N.Mathure/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2142372) अभ्यागत कक्ष : 27