संरक्षण मंत्रालय
प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका उदयगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द
Posted On:
01 JUL 2025 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2025
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएसएल) येथे बांधलेली प्रोजेक्ट 17ए श्रेणी मधील स्टेल्थ युद्धनौका प्रकारातील दुसरी नौका, यार्ड 12652 (उदयगिरी) हे 1 जुलै 2025 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. हा सेवेत सक्रिय असलेल्या शिवालिक वर्ग (प्रोजेक्ट 17) युद्धनौकांचाच एक भाग आहे. माझगाव डॉक लिमिटेड, मुंबई आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनिअर्स( जी आर एस ई ), कोलकाता येथे निर्मिती होत असलेल्या सात पी 17ए युद्धनौकांपैकी उदयगिरी ही दुसरी आहे.
C958.jpeg)
या बहु-अभियान युद्धनौका 'नील जल' वातावरणातील परिचालनास सुयोग्य असून भारताच्या सागरी हितसंबंध क्षेत्रातील पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांना तोंड देण्यास सक्षम आहेत. उदयगिरी हा त्याच्या पूर्वीच्या आयएनएस उदयगिरीचा आधुनिक अवतार आहे. हे एक वाफेवर चालणारे जहाज होते, देशाला 31 वर्षांची गौरवशाली सेवा दिल्यानंतर 24 ऑगस्ट 2007 रोजी ते निवृत्त झाले होते.
WYHN.jpeg)
पी-17ए जहाजांमध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये आहेत आणि त्यात 'अत्याधुनिक' शस्त्रे आणि सेन्सर्स बसवले आहेत, जे पी17वर्गातील एक महत्त्वपूर्ण सुधारणा आहेत. हे जहाज भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोमधील इन हाऊस डिझाइन क्षमतांमधील मोठी झेप दर्शविते. नवीन डिझाइन केलेली जहाजे 'एकात्मिक बांधकाम' या तत्वज्ञानाचा वापर करून देखील बांधली जात आहेत, ज्यामध्ये एकूण बांधकाम कालावधी कमी करण्यासाठी ब्लॉक टप्प्यांवर व्यापक पूर्व-सामग्री समाविष्ट आहे. आरंभ तारखेपासून 37 महिन्यांच्या विक्रमी वेळेत भारतीय नौदलाकडे उदयगिरी सुपूर्द करण्यात आले आहे.
MLLZ.jpeg)
उदयगिरीमुळे जहाजाची रचना, जहाज बांधणी आणि अभियांत्रिकी कौशल्य यातील देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडते. 200 हून अधिक एमएसएमईंनी समर्थित असलेल्या मजबूत औद्योगिक परिसंस्थेने हे सक्षम केले आहे. या युद्धनौकेमध्ये स्वदेशी ओईएमकडून मिळालेली प्रमुख शस्त्रे आणि सेन्सर्स बसविण्यात आले आहेत.
पी 17ए वर्गातील उर्वरित पाच जहाजे एमडीएल, मुंबई आणि जीआरएसई, कोलकाता येथे बांधकामाच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि 2026 च्या अखेरीला क्रमाक्रमाने उपलब्ध केली जातील.
* * *
S.Kane/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141354)