संरक्षण मंत्रालय
द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी लष्करप्रमुख भूतान दौऱ्यावर रवाना
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2025 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2025
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पीव्हीएसएम, एव्हीएसएम आज चार दिवसांच्या भूतान दौऱ्यासाठी रवाना झाले. दोन्ही देशांमधील संरक्षणविषयक सहकार्याला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने या अधिकृत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यादरम्यान लष्करप्रमुख भूतानचे राजे जिग्मे खेसार नामग्येल वांगचुक यांची भेट घेतील. ते रॉयल भूतान आर्मीचे चीफ ऑपरेशन ऑफिसर लेफ्टनंट जनरल बाटू शेरिंग यांच्यासोबत देखील चर्चा करतील. तसेच ते भारतीय दुतावास, भारतीय लष्करी प्रशिक्षण टीम(IMTRAT) आणि प्रोजेक्ट दंतकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही संवाद साधणार आहेत.
भारत आणि भूतान यांच्यात काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या आणि अतिशय दृढ असलेल्या संबंधांचे प्रतिबिंब आणि अतिशय जवळच्या आणि विश्वासार्ह भागीदारासोबतची वचनबद्धता या भेटीतून दिसून येत आहे.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2140833)
आगंतुक पटल : 37