युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. मनसुख मांडवीय यांनी पालिताणा येथे फिट इंडिया संडेज् ऑन सायकल मोहिमेचे केले  नेतृत्व; 'स्वच्छता सेनानीं'समवेत देशभरात 6000 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन


"आधुनिक पिढीमध्ये आपल्याला सायकलिंगचा कल रुजवावा लागेल" - डॉ. मनसुख मांडवीय

Posted On: 29 JUN 2025 3:37PM by PIB Mumbai

 

युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार व रोजगार केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी गुजरातमधील पालिताणा इथे फिट इंडिया संडे ऑन सायकलच्या विशेष आवृत्तीत विशेषतः 'स्वच्छता सेनानीं' आघाडीवरील स्वच्छता योद्ध्यांसह  नेतृत्व केले. देशभरात एकंदर 6000 हजार ठिकाणी एकाच वेळी आयोजित केलेल्या सायकलिंग मोहीमेत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातील कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, नगर पालिका निगम कर्मचारी तसेच राज्य आणि जिल्हा नगर पालिका यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

डिसेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या सायकलिंग या मोहिमेची ही 29 वी आवृत्ती आहे. फिट इंडिया संडेज ऑन सायकल या उपक्रमाचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी  त्यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमातही केला होता. त्यामुळे भारताच्या प्रमुख आरोग्य आणि तंदुरूस्ती मोहिमेपैकी एक म्हणून उपक्रमाचे स्थान भक्कम झाले आहे.

पालिताणा मध्ये, भावनगर जिल्ह्यातील विविध सायकलिंग क्लब्ज यामध्ये सामील झाले होते. डॉ. मांडवीय यांनी त्यांचे मूळगाव असलेल्या पालिताणा मध्ये बोलताना  हा उपक्रम चळवळीत रुपांतरीत झाला आहे.असे सांगितले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये हा उपक्रम सुरू केलेली फिट इंडिया चळवळ, संडेज ऑन सायकल " मुळे शक्य तितक्या प्रयत्नांनी पुढे नेत आहोत. हा केवळ एक उपक्रम राहिला नसून - ती एक चळवळ झाल्याचे डॉ. मांडवीय म्हणाले. स्वच्छता सेनानींच्या नेतृत्वाखाली, तंदुरूस्ती आणि स्वच्छता एकमेवांसमवेत राहतात हा महत्त्वाचा संदेश पाठवला जात आहे. लहान असो की मोठे त्यांनी विकसित भारतासाठी आपले योगदान दिले पाहिजे आणि आपल्याला आधुनिक पिढीसाठी सायकलिंगचा कल  रुजवावा लागेल. 

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत, राहगिरी फाउंडेशन, नवी दिल्ली महानगरपालिका परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 1,000 सायकलपटूंनी कॅनॉट प्लेस इथं हजेरी लावली होती. पद्मश्री पुरस्कार विजेती आणि माजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा  सुवर्ण पदक विजेती बबिता फोगट यांनी शारीरिक तंदुरुस्तीपलीकडे जाणाऱ्या चळवळीची निर्मिती करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.

"पंतप्रधानांनी जेव्हा या मोहिमेची सुरुवात केली होती, तेव्हा त्यात सहभागी होण्याचा आम्हाला आनंद झाला. अशा प्रकारचे उपक्रम मानसिक समाधान देणारे असतात आणि तरुणांना सक्रीय जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणारे असतात" असे फोगट म्हणाली.

डिसेंबर 2024 पासून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, माय भारत आणि योगासन भारत यांच्या सहकार्याने,युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी 'फीट इंडिया संडेज ऑन सायकल'चळवळ सुरू केली. ती आतापर्यंत देशभरातल्या 11,000 अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आली तसेच 4 लाखापेक्षा जास्त  लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला.

***

N.Chitale/VSS/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2140600)