संरक्षण मंत्रालय
भारताच्या संरक्षण राज्यमंत्र्यांनी मादागास्करच्या स्वातंत्र्याच्या 65 व्या वर्धापनदिन आणि सशस्त्र दलांच्या स्थापनेच्या उत्सवात केले भारताचे प्रतिनिधित्व
मादागास्करच्या सशस्त्र दल विभाग मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत केली चर्चा
Posted On:
28 JUN 2025 11:28AM by PIB Mumbai
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 25 ते 27 जून 2025 दरम्यान मादागास्करच्या अँटनानारीवो शहराला दिलेल्या अधिकृत भेटीत भारताच्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले. या दौर्यादरम्यान, संजय सेठ यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत मादागास्करच्या स्वातंत्र्याच्या 65 व्या वर्धापनदिन तसेच मादागास्कर सशस्त्र दलांच्या स्थापनेच्या सोहळ्यात सहभाग घेतला.
संजय सेठ यांनी मादागास्करचे सशस्त्र दल मंत्री लेफ्टनंट जनरल साहिवेलो लाला मोंजा डेल्फिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत–मादागास्कर द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रीत केले. संजय सेठ यांनी मादागास्करचे पंतप्रधान श्री क्रिश्चियन एनत्साय यांची भेट घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने मादागास्करच्या स्वातंत्र्याच्या 65 व्या वर्धापनदिनानिमित्त भारताच्या मैत्रीपूर्ण भावना व्यक्त करणाऱ्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी मादागास्करमधील अँटनानारीवो शहरात भारतीय दूतावासातर्फे आयोजित भारतीय समुदायाच्या स्वागत समारंभात सहभाग घेतला.या प्रसंगी त्यांनी मादागास्करमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या आर्थिक परिवर्तनाची सविस्तर माहिती दिली.
हिंदी महासागर क्षेत्रातील जवळचे शेजारी आणि सहविकसनशील देश या नात्याने, भारत आणि मादागास्कर यांच्यात दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आणि लोकसंवादावर आधारित जिव्हाळ्याचे बंध प्रस्थापित झाले आहेत. भारत नेहमीच मादागास्करच्या विकासप्रक्रियेत एक विश्वासू आणि कटिबद्ध भागीदार राहील.संरक्षण राज्यमंत्री श्री संजय सेठ यांच्या भेटीमुळे भारत-मादागास्कर भागीदारी आणखी बळकट करण्याची भारताची इच्छाशक्ती, परस्पर विश्वासावर आधारित सर्वांगीण सुरक्षा आणि प्रगतीसाठी सागरी सहकार्य (MAHASAGAR-Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) या दृष्टिकोनानुसार अधोरेखित झाली आहे.
***
A.Chavan/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140364)