युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ईशान्य प्रदेशच्या प्रगतीचा घेतला आढावा , पूर्वोत्तर संपर्क सेतू अंतर्गत श्रीभूमीला दिली भेट
विकासाचे प्रदर्शन : रक्षा खडसे यांच्या श्रीभूमी दौऱ्याने ईशान्येकडील जलद प्रगती केली अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
26 JUN 2025 4:46PM by PIB Mumbai
ईशान्य प्रदेशचा आपला वादळी दौरा सुरू ठेवत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज केंद्र सरकारच्या पूर्वोत्तर संपर्क सेतू आउटरीच उपक्रमांतर्गत श्रीभूमीला भेट दिली.

प्रशासकीय संबंध दृढ करण्यासाठी आणि संपूर्ण प्रदेशात विकासाला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला हा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. श्रीभूमीच्या एक दिवसाच्या भरगच्च दौऱ्यादरम्यान, खडसे यांनी 26 विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.या बैठकीत कृषी, आरोग्य, शिक्षण, मत्स्यपालन आणि कल्याणकारी योजनांमध्ये अलिकडच्या काळात जिल्ह्याने केलेल्या प्रगतीवर विशेष लक्ष देण्यात आले.
रक्षा खडसे यांनी क्षेत्र- स्तरावर जबाबदारीची गरज अधोरेखित केली आणि सीमावर्ती क्षेत्र तसेच चहाचे मळे असलेल्या क्षेत्रात अधिक समन्वय वाढवण्याचे आवाहन केले. त्यांनी युवा आणि क्रीडा हे सामाजिक उन्नतीचे प्रमुख चालक असल्याचे अधोरेखित केले आणि क्रीडा पायाभूत सुविधा आणि युवा-केंद्रित उपक्रमांना वाढीव पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

उनाकोटी येथील निरीक्षण आणि या आठवड्याच्या सुरुवातीला आगरतळाच्या एसएआय क्रीडा प्रशिक्षण केंद्राला अचानक भेट दिल्यानंतर खडसे यांच्या श्रीभूमी भेटीने जिल्ह्याच्या अलिकडच्या प्रगतीवर विशेष लक्ष केंद्रित केले. तळागाळातील घटकांशी संवाद तसेच सेवा वितरणाबाबत प्रत्यक्ष अभिप्राय मिळवण्यासाठी नागरी समाज संघटनांच्या सदस्यांना भेटून श्रीभूमीतील त्यांच्या दौऱ्याची सांगता झाली.
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2139987)
आगंतुक पटल : 29