अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

एक्सियॉम-4 मिशन देशाच्या विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने प्रगतीचे संकेत देत असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे गौरवोद्गार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एक्सियॉम 4 ने विक्रम साराभाई यांचे स्वप्न साकारले: डॉ.जितेंद्र सिंह

इस्रोची जागतिक कामगिरी : पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या सुधारणांमुळे भारत अंतराळ संशोधनात आघाडीवर आहे

अनुयायी ते आघाडीवर: भारत आता अंतराळ उपक्रमांमध्ये समान जागतिक भागीदार आहे

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला स्वदेशी किटचा वापर करून अंतराळात प्रगत प्रयोग करणार

प्रविष्टि तिथि: 25 JUN 2025 10:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2025

"एक्सियॉम-4 मिशन देशाच्या विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने प्रगतीचे संकेत देत आहे," असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे अनुसंधान भवनाच्या भटनागर सभागृहात शुभांशु शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या एक्सियॉम 4 च्या यशस्वी प्रक्षेपणाचे लाईव्ह स्क्रीनिंग पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांबरोबर अंतराळवीरांना उभे राहून अभिवादन केल्यावर बोलत होते.

भारतासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण असून, एक्सियॉम 4 मिशनचे प्रक्षेपण हे विकसित भारत बनण्याच्या दिशेने देशाच्या प्रवासातील एक मोठी झेप आहे, असे ते यावेळी म्हणाले.

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (आयएसएस) जाणाऱ्या चार सदस्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रू चे नेतृत्व करत आहेत.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, "भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांच्या स्वप्नाची ही पूर्तता असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ती पूर्ण होत आहेत."

डॉ. जितेंद्र सिंह यांनी या ऐतिहासिक टप्प्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या धाडसी सुधारणांना दिले असून, ज्याने भारताला तंत्रज्ञान अनुयायी, ते अंतराळ संशोधनातील समान आणि आदरणीय जागतिक भागीदार या टप्प्यावर पोहोचवले आहे.

जितेंद्र सिंह यांनी या मोहिमेतील भारताच्या योगदानावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, ग्रुप कॅप्टन शुक्ला आयआयटी, आयआयएससी आणि बायोटेक्नॉलॉजी विभाग (डीबीटी) यासारख्या आघाडीच्या भारतीय संस्थांनी तयार केलेले देशांतर्गत विकसित प्रयोग किट्स अंतराळात घेऊन जात आहेत. या किट्सचा वापर आयएसएसमध्ये प्रगत प्रयोग करण्यासाठी केला जाईल.

"सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि वैश्विक किरणोत्सर्गाचा, खाद्य सूक्ष्म शैवालावर, जे प्रथिने, लिपिड्स आणि जैव सक्रिय संयुगांनी समृद्ध असून पोषक तत्वांनी भरले आजे, शाश्वत अन्नाचा स्रोत, आणि दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी आदर्श आहे, त्याच्या वाढीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे हे या जैवतंत्रज्ञान प्रयोगांचे उद्दिष्ट आहे." ते म्हणाले.

भविष्यातील दूरवरच्या अंतराळ मोहिमा आणि अंतराळातील मानवी उपस्थितीच्या दीर्घकालीन शाश्वततेसाठी या अभ्यासामुळे लक्षणीय योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे, ज्यामध्ये भारताच्या बहुप्रतिक्षित गगनयान मोहिमेचा समावेश आहे.

हे अंतराळयान 26 जून रोजी सकाळी 7 वाजता म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता आयएसएसवर उतरण्याची शक्यता आहे.

संशोधन भवन, नवी दिल्ली येथे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाला इतर मान्यवर उपस्थित होते. यामध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नर फ्रान्सिस अॅडमसन एसी, आणि भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांचा समावेश होता. त्यांनी कार्यक्रमापूर्वी डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली.

याशिवाय, सीएसआयआरचे महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्यासह ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विविध विज्ञान विभाग आणि स्वायत्त संस्थांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

एक्सियॉम-4 मिशन ही केवळ वैज्ञानिक कामगिरी नसून, जागतिक तंत्रज्ञान महासत्ता म्हणून भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेचा वस्तुपाठ आहे. यामुळे देशाची अंतराळ नवोन्मेषाचे नेतृत्व करण्याची, शाश्वततेला प्रोत्साहन देण्याची आणि जागतिक मोहिमांमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्याची क्षमता बळकट होत आहे.


S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2139736) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Tamil , Urdu , हिन्दी