युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
योगासन भारतच्या सहकार्याने, नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी फिट इंडिया संडेज ऑन सायकलचे नेतृत्व केले. सायकलवरून नियमित एक फेरफटका देखील भारताला तंदुरूस्तीची महाशक्ती बनवेल, असे सांगितले.
Posted On:
22 JUN 2025 6:11PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज येथील जवाहरलाल नेहरून स्टेडियममध्ये फिट इंडिया ऑन सायकल कार्यक्रम मोठ्या संघटित ऊर्जेने सुरू झाला. योगासन भारत यांच्या सहकार्याने भारतभरात आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये, राष्ट्रीय राजधानी आयोजित कार्यक्रमाला अनेक प्रेरणादायी खेळाडू आणि प्रसिद्ध व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. यामध्ये अभिनेत्री तसेच फिट इंडियाची दूत म्हणून निवड झालेली मिया मेलझर, ऑलिम्पिक रेस वॉकर प्रियांका गोस्वामी, माजी भारतीय हॉकी कर्णधार राणी रामपाल, तायक्वांदो चॅम्पियन रोडाली बारुआ आणि फिट इंडिया आयकॉन असलेल्या भारतीय अभिनेत्री मधुरीमा तुली यांचा समावेश होता.

21 जून रोजी साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर हा सायकलिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मांडवीय म्हणाले, "या रविवारचा सायकलिंग कार्यक्रम विशेष होता. काल देशभरात 6000हून अधिक ठिकाणी योग कार्यक्रम पार पडले आणि एक कोटीहून अधिक लोकांनी 10 लाखांहून अधिक ठिकाणी सहभाग घेतला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनांतर्गत, फिट इंडिया ही एक मोहीम झाली आहे. आपण सायकल पेडल मारत पुढे नेतो तेव्हा भारताला तंदुरूस्तीचे उर्जागृह बनवतो. कालच्या योगापासून ते आजच्या सायकलिंग पर्यंत आणि उद्याच्या ऑलिम्पिक दिनापर्यंत तंदुरूस्तीची ही क्रांती प्रत्येक भारतीयाला जोडणारी आहे."

***
S.Patil/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2138789)