संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दलाने 60 पेक्षा जास्त ठिकाणी ‘योग संगम’ सह साजरा केला 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस

Posted On: 21 JUN 2025 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2025

 

भारतीय तटरक्षक दलाने 21 जून 2025 रोजी 'योग संगम' सह 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) साजरा केला. या कार्यक्रमात भारताच्या किनारपट्टीवर आणि बेटांच्या प्रदेशांमधील 60 पेक्षा जास्त ठिकाणी हजारो कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहाने भाग घेतला. आयुष मंत्रालयाच्या 'एक पृथ्वी, एक आरोग्य'  या जागतिक संकल्पनेला अनुसरून, आयसीजीच्या या सोहळ्यांनी सर्वांगीण कल्याण, शिस्त आणि परिचालनात्मक सज्जतेसाठी त्यांची खोलवर रुजलेली बांधिलकी अधोरेखित केली. 

भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) सर्व क्षेत्रांमध्ये योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यात वायव्य क्षेत्रातील जाखौ, मुंद्रा, वाडीनार, ओखा, पिपावाव, सूरत, गांधीनगर आणि वेरावळ येथील युनिट्सनी उत्साहाने भाग घेतला. पश्चिम किनारपट्टीवर, मुंबई, गोवा, कारवार आणि मंगळूरसारख्या प्रमुख तळांवर मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते, तर पूर्व किनारपट्टीवर चेन्नई, विशाखापट्टणम, पारादीप आणि हल्दिया येथे उत्साहाने योग दिन साजरा करण्यात आला. दक्षिणेकडील मंडपम आणि कोची, तसेच पोर्ट ब्लेअरसारख्या बेटांवरील प्रदेशांमध्येही उत्साही सहभागाची नोंद झाली, ज्यामुळे या उपक्रमाची खऱ्या अर्थाने अखिल भारतीय व्याप्ती दिसून आली.

आयसीजी कॉम्प्लेक्स, नॉयडा (दिल्ली NCR) येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे आयसीजीचे महासंचालक परमेश शिवमणी यांनी 1,000 पेक्षा जास्त सहभागींना संबोधित केले. जास्त दबाव असलेल्या सागरी वातावरणात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक स्पष्टता, ताण-तणाव व्यवस्थापन आणि शारीरिक लवचिकता वाढविण्यात योगाभ्यासाची महत्त्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

वंदना गुप्ता आणि सहा तज्ञ प्रशिक्षकांच्या टीमने या सत्राची हाताळणी केली. त्यांनी उपस्थितांना आसने, प्राणायाम आणि ध्यान यांसारख्या योग पद्धतींबद्दल मार्गदर्शन केले, जे नवशिके आणि नियमित सराव करणाऱ्या या दोघांसाठीही उपयुक्त होते. आयसीजी कर्मचाऱ्यांच्या अतिशय तणावाच्या जीवनशैलीत सहजपणे सामावून जाणाऱ्या सोप्या दिनचर्येवर विशेष भर देण्यात आला.

 

* * *

M.Pange/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2138497)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil