संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

9 लाखांपेक्षा जास्त राष्ट्रीय छात्रसैनिकांनी (NCC) एकत्रित योग सत्रांमध्ये सहभागी होऊन 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस केला साजरा

प्रविष्टि तिथि: 21 JUN 2025 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2025

 

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) नऊ लाखांपेक्षा जास्त छात्रसैनिकांनी देशभरातील महत्त्वाच्या स्थानांवर एकाच वेळी आयोजित केलेल्या योग सत्रांमध्ये भाग घेऊन 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस  मोठ्या उत्साहात साजरा केला. अतिशय मोठ्या प्रमाणातील या सहभागातून या छात्रसैनिकांनी आरोग्य आणि निरोगी जीवनाप्रति देशाच्या अतूट बांधिलकीचे दर्शन घडवले.

उत्तरेकडे लेहपासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेला द्वारकेपासून पूर्वेला तेझूपर्यंत, भारतातील काही अत्यंत प्रसिद्ध आणि निसर्गरम्य ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात ऋषिकेशमधील त्रिवेणी घाट, चेन्नईतील मरीना बीच, गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, लेहमधील शांती स्तूप, गुवाहाटीमधील ब्रह्मपुत्रेचे काठ आणि जम्मू-काश्मीरमधील दल सरोवर यांसारख्या ठिकाणांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, देशभरातील सार्वजनिक उद्याने, शाळा आणि महाविद्यालयांमध्येही योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. दिल्लीमध्ये, आर्मी स्टाफचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी प्रसिद्ध करिअप्पा परेड मैदानावर सैन्यदलातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत योगासने केली. या कार्यक्रमात 25 देशांतील डिफेन्स अटॅची, एनसीसी छात्रसैनिक, शाळकरी मुले आणि सैन्य दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसह 3,400 पेक्षा जास्त सहभागींनी भाग घेतला.

या कार्यक्रमाच्या काटेकोर नियोजनाद्वारे, एनसीसीने देशभरात आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आपली दृढ वचनबद्धता प्रदर्शित केली आहे. ही तत्त्वे भारताच्या युवा पिढीमध्ये खोलवर रुजलेली असल्याचे छात्रसैनिकांच्या विस्तृत सहभागातून दिसून आले, ज्यामुळे राष्ट्रनिर्मितीमध्ये एनसीसीची महत्त्वाची भूमिका अधोरेखित होत आहे. शिस्त, तंदुरुस्ती आणि आरोग्याची मूल्ये रुजवून, एनसीसी एका बळकट आणि सातत्याने क्रियाशील समाजाला आकार देत आहे.

 

* * *

M.Pange/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2138394) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , English , Urdu , Tamil , Telugu