अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्र्यांनी आज नवी दिल्ली येथे सीबीआयसीचे प्रधान मुख्य आयुक्त, मुख्य आयुक्त आणि महासंचालक यांच्यासमवेत आयोजित परिषदेचे भूषविले अध्यक्षस्थान
Posted On:
20 JUN 2025 6:43PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) परिषदेचे अध्यक्षपद भूषवले, ज्यामध्ये सीबीआयसीचे प्रधान मुख्य आयुक्त, मुख्य आयुक्त आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या महासंचालकांचा समावेश होता.

सीबीआयसी परिषदेच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी भाषण केले आणि निर्यात तपासणीसाठी आयसीईटीएबी उपकरणाचे उद्घाटन केले.


संवादादरम्यान, सीतारमण यांनी तंत्रज्ञान आणि जोखीम-आधारित पॅरामीटर्सचा वापर करून करदात्यांसाठी जीएसटी नोंदणी प्रक्रिया सोपी, अखंड आणि अधिक पारदर्शक बनवण्याची गरज असल्यावर भर दिला.

करदात्यांना अर्ज प्रक्रियेत मदत करण्यासाठी जीएसटी नोंदणीसाठी समर्पित हेल्पडेस्क ठेवण्याचे निर्देशही त्यांनी सीजीएसटी क्षेत्र प्रमुखांना दिले.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करदात्यांना वेळेवर आणि दर्जेदार मदत मिळण्याच्या दृष्टीने जीएसटी सेवा केंद्रे आणि सीमा शुल्क सुविधा केंद्रे उत्तम कर्मचारीयुक्त, सुलभ आणि योग्यरित्या देखभाल राखलेली आहेत याची खात्री करण्याची गरज अधोरेखित केली.

करदात्यांच्या विश्वासावर भर देत, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तक्रारींचे निवारण करण्यावर लक्ष्यित आणि सतत लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले, सुधारित प्रणाली आणि उत्तरदायित्व यांद्वारे चौकशी आणि तक्रारींचे वेळेवर निराकरण सुनिश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
एमएसएमई आणि निर्यातदारांसाठी वेळेवर निवारण आणि व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी, जीएसटी आणि सीमाशुल्क परताव्यांची प्रक्रिया जलद करावी, असे आवाहन अर्थमंत्र्यांनी सीबीआयसीला केले.

क्षेत्रीय रचना मजबूत करण्यासाठी तसेच प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध स्तरांवरील सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचे आवाहन सीबीआयसीला करण्यात आले.
श्रीमती सीतारमण यांनी मुख्य आयुक्त आणि महासंचालकांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात व्यापार सुलभीकरण उपाययोजना सक्रियपणे हाती घेण्यास आणि प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सीबीआयसी मुख्यालयाला कृतीयोग्य सूचना सादर करण्यास प्रोत्साहित केले.

***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2138193)