संरक्षण मंत्रालय
आयएनएस अर्नाळा भारतीय नौदलात दाखल; विशाखापट्टणमच्या नाविक तळावर सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत अर्नाळा चे जलावतरण
स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 16 पाणबुडीविरोधी पथकातील पहिली नौका;अत्याधुनिक युद्ध उपकरणे ,सेन्सर प्रणालीसह सज्ज
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2025 4:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2025
भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडमध्ये 'आयएनएस अर्नाळा' या पहिल्या स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौकेतील शॅलो वॉटर क्राफ्ट 18 जून 2025 रोजी नौदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये दाखल झाली. पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी आयोजित केलेल्या या समारंभात वरिष्ठ नौदल अधिकारी, प्रतिष्ठित नागरी, माजी कमांडिंग अधिकारी उपस्थित होते. आयएनएस अर्नाळा च्या समावेशामुळे भारताची संरक्षण क्षमता अधिक बळकट झाली असून, स्वदेशी डिझाइन,अभियांत्रिकी आणि उत्पादनाच्या यशाचेही हे प्रतीक आहे. स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांमध्ये आता अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक युद्ध सुईट्स आणि प्रगत सेन्सर यासारख्या प्रणालींचा समावेश असून, यामुळे नौदलाची युद्ध सज्जता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने भारताची वाटचाल अधिक गतिमान झाली आहे. भारतीय नौदलाच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सामरिक दृष्टिकोन राबवण्यासाठीच्या कटिबद्धतेचे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी कौतुक केले. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्याच्या नावावरून नौकेला आयएनएस अर्नाळा हे नाव देण्यात आले आहे. भविष्यातील संरक्षण आव्हानांचा सामना करण्यासाठी नौदल बळकटीकरणाच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.
00QU.jpeg)
SWQS.jpeg)
QF8J.jpeg)
ZZAV.jpeg)
S.Bedekar/R.Dalekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2137472)
आगंतुक पटल : 11