आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या वतीने उद्या 'योग बंधन' चे आयोजन

Posted On: 16 JUN 2025 10:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जून 2025


केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या उत्सवाचा भाग म्हणून 17 जून 2025 रोजी  'योग बंधन' आयोजित करणार आहे. हा उपक्रम आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या संदर्भात प्रोत्साहन देण्यात येणाऱ्या 10 प्रमुख कार्यक्रमांपैकी एक आहे आणि विविध संस्थांदरम्यान बंध निर्माण करून जागतिक सहकार्य मजबूत करण्याप्रति भारताची वचनबद्धता  यातून प्रतिबिंबित होते.

हा अनोखा उपक्रम लोकांमधील देवाणघेवाणीवर भर देतो आणि जगभरातील योग क्षेत्रातील आघाडीचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी - शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, लेखक, प्रशिक्षक आणि स्टुडिओ संस्थापक यांना  एकत्र आणतो.

योग बंधनच्या उद्घाटन सत्रात आयुष मंत्रालयाचे   सचिव वैद्य राजेश कोटेचा; आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव  मोनालिसा दास; आयसीसीआरच्या महासंचालक  के. नंदिनी सिंगला; आणि एमडीएनआयवायचे संचालक डॉ. काशीनाथ समगंडी यांच्यासह मान्यवरांचे  प्रमुख भाषण होईल. उद्घाटन कार्यक्रमानंतर, प्रतिनिधी एमडीएनआयवाय परिसराच्या  क्युरेटेड टूरमध्ये आणि संप्रेषण आणि ज्ञान देवाणघेवाणीवरील संवादात्मक सत्रात सहभागी होतील.

हे प्रतिनिधी सांस्कृतिक भेटी आणि संस्थात्मक संवादांना उपस्थित राहतील. 21 जून  2025 रोजी होणाऱ्या भव्य आंतरराष्ट्रीय दिन  कार्यक्रमातील सहभागाने  त्यांच्या दौऱ्याची सांगता होईल.  त्यांच्या येथील वास्तव्यादरम्यान, ते समर्पित योग सत्रे , एकात्मिक कल्याणावर चर्चा यांमध्ये सहभागी होतील,  अनुभवांची देवाणघेवाण करतील आणि भारतीय संस्थांसोबत सहकार्याच्या  संधींचा शोध घेतील.

योग बंधन हा योग क्षेत्रातील भारताच्या सॉफ्ट पॉवर आणि जागतिक नेतृत्वाचा दाखला आहे. दीर्घकालीन संस्थात्मक भागीदारीला चालना देऊन आणि सांस्कृतिक संवाद वाढवून, हा उपक्रम सामूहिक कल्याण, सुसंवाद आणि दृढ  राजनैतिक संबंधांसाठी एक सेतू म्हणून काम करतो.


N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2136846)