दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एआय-नेटिव्ह नेटवर्क इनोव्हेशनच्या जागतिक प्रदर्शनाने एफजी-एआयएनएन बिल्ड-अ-थॉन 2025 चा समारोप

Posted On: 13 JUN 2025 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2025

जगभरातील 10 अंतिम संघांद्वारे  अभिनव , एआय-नेटिव्ह टेलिकॉम सोल्यूशन्सच्या यशस्वी सादरीकरणाने फोकस ग्रुप-एआय नेटिव्ह नेटवर्किंग (AINN) बिल्ड-अ-थॉन 2025 चा आज समारोप  झाला. 11जून  2025 पासून नवी दिल्ली येथे झालेल्या आयटीयू फोकस ग्रुप ऑन ऑटोनॉमस नेटवर्क्स (एफजी-एआयएनएन) च्या तिसऱ्या बैठकीचा भाग म्हणून आयोजित या कार्यक्रमात भविष्यातील स्वायत्त नेटवर्क्समध्ये मानकीकरणासाठी महत्त्वाचे योगदान देण्यात आले.

 

 

दूरसंचार विभागाची तांत्रिक शाखा असलेल्या टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सेंटर (TEC) आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ (ITU) यांनी संयुक्तपणे सुरू केलेले, बिल्ड-अ-थॉन हे एफजी-एआयएनएनच्या उद्दिष्टांना अनुरूप जागतिक नवोन्मेष व्यासपीठ म्हणून काम करत होते.

या जागतिक नवोन्मेष आव्हानाचा उद्देश एआय-नेटिव्ह नेटवर्किंग प्रणालीच्या  विकासाला गती देणे, प्रमुख त्रुटी  ओळखून, वापर प्रकरणे प्रस्तावित करून, रचनात्मक दृष्टिकोन   विकसित करून आणि संकल्पनांचे पुरावे तयार करून आंतरराष्ट्रीय मानकीकरण प्रयत्नांना हातभार लावणे  हा होता. बिल्ड-ए-थॉनने विकासक , संशोधक, विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि दूरसंचार  व्यावसायिकांसाठी क्लोज-लूप ऑटोमेशन, इंटेंट-बेस्ड ऑपरेशन्स आणि डिजिटल ट्विन इकोसिस्टमसह स्वायत्त नेटवर्कसाठी ओपन-सोर्स सोल्यूशन्स तयार करण्यासाठी एक सहयोगी व्यासपीठ ठरले आहे.

एफजी-एआयएनएन बिल्ड-अ-थॉन 2025, हा एक क्राउडसोर्स्ड कोडिंग कार्यक्रम  होता, ज्यामध्ये शैक्षणिक, उद्योग आणि स्टार्टअप्समधील तज्ञ एकत्र आले आणि परस्परसंवादी मार्गदर्शन आणि सहयोगी सत्रांद्वारे एआय-नेटिव्ह संकल्पनांचे व्यावहारिक प्रात्यक्षिक सादर केले.या कार्यक्रमासाठी नोंदणी मे  2025 च्या प्रारंभी सुरू झाली, त्यानंतर नियमित मार्गदर्शन सत्रे झाली. जगभरातील 57 सहभागी असलेल्या एकूण 23 संघांनी नोंदणी केली, त्यापैकी 10 संघांची  आजच्या  अंतिम सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती.

अंतिम  निवड झालेल्या सर्व सहभागींना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले आणि अव्वल  तीन पुरस्कार टीम स्लाईसमाइंड्स (प्रथम स्थान), टीम एसएनआर (द्वितीय स्थान) आणि टीम नोवायर्सअटॅचड (तृतीय स्थान) यांना देण्यात आले.टीम एआयओनेटएक्सला सर्वोत्कृष्ट महिला संघ म्हणून आणि टीम ओएमएसीएस आणि एसएसएन यांना मार्गदर्शनातील उत्कृष्टतेसाठी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.

हे बिल्ड-अ-थॉन डिजिटल परिवर्तन आणि शाश्वत दूरसंचार नवोन्मेषाला  चालना देण्यासाठी नैतिक, समावेशक आणि जागतिक स्तरावर प्रमाणित एआयला प्रोत्साहन देण्याच्या भारत आणि आयटीयूच्या सामायिक ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.


N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2136291)
Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam