नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
हरित वित्तपुरवठ्याला चालना देण्यासाठी इरेडाने क्यूआयपीद्वारे यशस्वीरित्या उभारले ₹2,005.90 कोटी
Posted On:
11 JUN 2025 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2025
इरेडा अर्थात भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था लिमिटेडने क्यूआयपीद्वारे ₹2,005.90 कोटी यशस्वीरित्या उभारले आहेत. प्रति शेअर ₹165.14 या किमतीत 12.15 कोटी इक्विटी शेअर्स जारी करून भांडवल उभारण्यात आले, ज्यामध्ये ₹10 च्या दर्शनी मूल्यावर ₹155.14 प्रति शेअर प्रीमियम समाविष्ट आहे.
165.14 रुपयांचे निर्गम मूल्य 173.83 रुपये प्रति समभागाच्या निर्धारित किमतीवर 5.00 टक्के सवलत दर्शवतो. क्यूआयपी इशू 5 जून, 2025 ला आणला गेला आणि 10 जून, 2025ला बंद झाला. विमा कंपन्या, अनुसूचित वाणिज्यिक बँका आणि परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांसह देशाअंतर्गत आणि परदेशी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (क्यूआयबी) विविध समूहांकडून उत्साहात्मक प्रतिसाद मिळाला. मंडळाने आज म्हणजे 11 जून, 2025 ला झालेल्या बैठकीत पात्र संस्थात्मक खरेदीदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यास मान्यता दिली आहे.
क्यूआयपीमध्ये ₹1,500 कोटींच्या बेस इश्यू आकाराच्या तुलनेत ₹2,005.90 कोटींच्या बोली आल्या होत्या, ज्यामुळे 1.34 पट सबस्क्रिप्शन मिळाले. या यशस्वी इश्यूद्वारे उभारण्यात आलेले भांडवल इरेडाचे टियर-I भांडवल आणि एकूण भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीएआर) आणखी मजबूत करेल. यामुळे देशात विस्तारत असलेल्या अक्षय ऊर्जा क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी कंपनीची क्षमता वाढेल.
इरेडाने सर्व संस्थात्मक गुंतवणूकदार आणि भागधारकांचे त्यांच्या निरंतर पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि देशाच्या स्वच्छ ऊर्जा वित्तपुरवठा उपक्रमांचे नेतृत्व करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली.
* * *
S.Patil/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135847)