कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते मध्य प्रदेशात सिहोर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी


“लखपती दीदींची संख्या वाढवण्याप्रती सरकार कटिबद्ध आहे” – केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानात सहभागी होण्याचे केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन

Posted On: 07 JUN 2025 6:10PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज मध्य प्रदेशातील सिहोर इथे  कोट्यवधी  रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि  पायाभरणी देखील केली.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री चौहान यांनी प्रत्येकाला विकास विषयक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यात आम्ही कोणतीही कसूर करणार नाही. गावांचा तसेच देशाचा विकास केवळ जनतेचा पाठींबा आणि सहकार्यामुळेच शक्य असतो. देशाचा विकास गावांच्या विकासावर अवलंबून असतो असे ते म्हणाले. 

गरिबांसाठीच्या घरांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की 2018 प्लस च्या  सूचीनुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) गरिबांसाठी 14 लाख घरांच्या उभारणीला मंजुरी मिळाली आहे.

देशभरातील 1.48 कोटी महिला ‘लखपती दीदी’ (वर्षभरात 1 लाख रुपये अथवा त्याहून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या महिला) झाल्या आहेत असे अभिमानाने सांगत केंद्रीय मंत्री म्हणाले की कोणतीही महिला गरीब राहू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. लखपती दीदींच्या संख्येत आणखी वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री चौहान यांनी देशभरात सध्या सुरु असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानाबाबत देखील चर्चा केली. ते म्हणाले, “मी 16,000 शास्त्रज्ञांना प्रयोगशाळांच्या बाहेर पडून गावांमध्ये जाण्याच्या सूचना केल्या आहेत. हे शास्त्रज्ञ आता ग्रामीण भागांना भेटी देऊन त्यांचे संशोधन थेट शेतकऱ्यांशी सामायिक करत आहेत. शास्त्रज्ञांकडून मिळणारी माहिती लक्षपूर्वक ऐकून त्यांच्या शिफारसींचा उपयोग शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी करावा अशी विनंती मी शेतकऱ्यांना करतो. विकसित भारतासाठी विकसित कृषी (विकसित शेती) साध्य करणे हा आमचा निर्धार आहे.”

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2134937)
Read this release in: English , Hindi , Gujarati , Tamil