लोकसभा सचिवालय
ब्राझीलमध्ये ११ व्या ब्रिक्स संसदीय मंचाच्या समारोपप्रसंगी लोकसभा अध्यक्षांचे निवेदन
Posted On:
07 JUN 2025 12:40PM by PIB Mumbai
ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी संसद, सरकार आणि या देशातील जनतेचे आभार मानतो.
ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अर्थपूर्ण संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि ब्रिक्स राष्ट्रांमध्ये संसदीय सहकार्य मजबूत करण्यासाठी, एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक बाबींवर एकत्रितपणे काम करण्यासाठी सामायिक वचनबद्धता दिसून आली. शिखर परिषदेचा समारोप अंतिम घोषणापत्र स्वीकारून झाला.
B3PD.jpg)
‘आपण एकत्रितपणे दहशतवादाविरुद्ध लढले पाहिजे’ यावर अंतिम घोषणेमध्ये, ब्रिक्स देशांनी सहमती दर्शवली. परिषदेने २२ एप्रिल रोजी भारतातील काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी घटनेचा निषेध केला आणि संयुक्त प्रयत्नांद्वारे दहशतवादाविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरण स्वीकारण्याच्या गरजेवर भर दिला.
भारताच्या पंतप्रधानांनी जगातील सर्व देशांना दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
भविष्यात आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कोणत्या दिशेने आणि पद्धतीने करायचा यावरही चर्चा झाली. एआयचा वापर केला पाहिजे यावर एकमत झाले आणि ते खरोखरच आवश्यक आहे. परंतु त्याच्या वापरात पारदर्शकता आणि जबाबदारी देखील असली पाहिजे. याव्यतिरिक्त, आर्थिक समावेशन आणि ब्रिक्स राष्ट्रे व्यापार कसा वाढवू शकतात आणि आपापसात आर्थिक सहकार्य कसे सुधारू शकतात यावर चर्चा केंद्रित होत्या. भारताने नेहमीच कायद्याचे/ न्याय आधारित राज्य, जागतिक सहकार्य आणि जागतिक स्तरावर संवादाच्या गरजेला पाठिंबा दिला आहे.
पुढील ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार आहे. इतर ब्रिक्स राष्ट्रांच्या सहकार्याने, आम्ही आर्थिक, सामाजिक, व्यापार, एआय आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू. भारतात होणाऱ्या शिखर परिषदेसाठी रूपरेषा निश्चित केली जाईल आणि भारत या कार्यक्रमाचे यशस्वी आणि फलदायी आयोजन सुनिश्चित करेल.
मी सर्व ब्रिक्स राष्ट्रांचे आभार मानतो आणि विश्वास व्यक्त करतो की, संयुक्त प्रयत्न, संसदीय देवाणघेवाण, कल्पनांचे आदानप्रदान, सर्वोत्तम पद्धती आणि अनुभव यांच्या माध्यमातून आपण आपल्या नागरिकांशी संवाद साधू शकतो आणि त्यांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणू शकतो.
मी सर्व ब्रिक्स राष्ट्रांच्या संसदेच्या सभापती आणि अध्यक्षांना माझ्या शुभेच्छा देतो.
धन्यवाद.
***
NM/H.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134888)