गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक प्रदुषणा विरोधातील मोहिमेने घेतला वेग

Posted On: 05 JUN 2025 10:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2025

दरवर्षी, 5 जून रोजी, जागतिक पर्यावरण दिन नागरीक, समुदाय आणि देशांना पर्यावरणाप्रति नैतिकता जोपासण्याच्या सामूहिक वचनबद्धतेसाठी एकत्र आणतो.

या वर्षी, "जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत" ही संकल्पना पृथ्वी ग्रहावरील सर्वात गंभीर संकटांपैकी एक असलेल्या प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्याचे कळकळीचे आवाहन करते. स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 (एसबीएम-यू 2.0) च्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने, गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालय, जनजागृती, कृती आणि दीर्घकालीन वर्तणुकीत  बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवून, प्रभावी उपक्रमांच्या मालिकेद्वारे (1 ते 5 जून 2025) या जागतिक चळवळीला बळकटी देण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

स्वच्छ भारत अभियानाने शहरी भारताचा कायापालट करण्यासाठी सामूहिक नागरी कृतीची ताकद सिद्ध केली आहे. आता, ते शाश्वतता आणि पर्यावरणीय संतुलनासाठी व्यापक प्रयत्न करत आहे. जागतिक पर्यावरण दिन  2025 चा एक भाग म्हणून (1-5 जून) एसबीएम-यू ने पुढील उपक्रम सुरु केले आहेत:

(i) प्लास्टिक आऊट, फॅब्रिक इन - जास्त वर्दळ असलेल्या भागात कापडी पिशवीचे वेंडिंग मशीन.

(ii) आरआरआर केंद्रांवर प्लास्टिक संकलन मोहीम, आणि

(iii) स्वच्छ भारत हरित भारत हरित संकल्प.

जागतिक पर्यावरण दिन  2025 च्या निमित्ताने, भारतातील शहरांनी शाश्वतता आणि प्लास्टिकमुक्त जीवनाला प्रोत्साहन देणारे प्रभावी उपक्रम सुरू केले आहेत. मीरा भाईंदर येथील “थैला बँक”, आरआरआर केंद्रांमधील जुने कपडे बचत गटाच्या महिलांनी शिवलेल्या पुन्हा वापरता येण्याजोग्या कापडी पिशव्यांमध्ये रूपांतरित करत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये, नागरिक आणि महानगरपालिकेने सिंगल युज प्लास्टिक - मुक्त भविष्याला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण शहरात सायकल रॅली काढल्या, आणि हरित प्रतिज्ञा घेऊन त्याचा समारोप झाला.


S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2134406)
Read this release in: English , Urdu , Hindi