संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पर्यावरण दिन 2025 : शाश्वत भविष्याच्या दिशेने भारतीय नौदलाचे प्रयत्न

Posted On: 05 JUN 2025 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2025

पर्यावरणीय जबाबदारीप्रती कटिबद्ध असलेले दल म्हणून भारतीय नौदलाने नवीकरणीय उर्जेच्या दिशेने होणाऱ्या स्थित्यंतराला वेग देणे तसेच शाश्वत पद्धतींच्या माध्यमातून त्याची पर्यावरणीय पदचिन्हे कमी करणे सुरु ठेवले आहे. नौदलाचा हरित उपक्रम गतिमान होत असतानाच जागतिक पर्यावरणदिनासारखे निमित्त पर्यावरणविषयक जागतिक प्रयत्नांप्रती नौदलाची बांधिलकी अधिक बळकट करण्यात महत्त्वाचा टप्पा ठरते. यावर्षी, देशभरातील नौदलाच्या तुकड्या तसेच आस्थापनांनी 'अधिक स्वच्छ तसेच अधिक हरित पर्यावरणा' च्या दिशेने होणाऱ्या स्थित्यंतराला चालना देणारे उपक्रमांचे विस्तृत संच सुरु केले आहेत.

जागतिक पर्यावरण दिन 2025 ची संकल्पना ‘जगभरात प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण थांबवण्या’वर लक्ष केंद्रित करते. या संकल्पनेचा विस्तार करत, सर्व केंद्र आणि राज्य सरकारी संस्था तसेच मोठ्या प्रमाणातील सरकारतर्फे नामनिर्देशित आणि पर्यावरणाप्रती सजग संस्था यांच्याशी सखोल संवाद साधून नौदल तळांना ‘प्लास्टिकमुक्त भाग’ म्हणून जाहीर करणे, एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी वेबिनार तसेच पोस्टर स्पर्धा, सार्वजनिक शपथ ग्रहणाचे आयोजन, किनारपट्टी भागातून प्लास्टिकचे निर्मुलन तसेच संकलन, खारफुटीच्या लागवडीसाठी नवे उपक्रम, समुद्री शैवालाची लागवड आणि प्रवाळ खडकांचे सर्वेक्षण यांसारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत.

तटवर्ती भागाचे जतन करण्याप्रती नौदलाची कटिबद्धता आणखी बळकट करत, हॅबीटॅट ट्रस्ट आणि एचसीएल फाउंडेशन यांच्याशी झालेल्या सामंजस्य करारांतर्गत कचरा गोळा करणारे तरंगते अडथळे उभारण्याची व्यवहार्यता तपासणे तसेच जैवविविधता संबंधी सर्वेक्षणे घेणे इत्यादी कार्यांतून तटवर्ती परिसंस्थेला पुनरुज्जीवित करण्यात येत आहे.

पर्यावरण संवर्धनात शिक्षणाची महत्त्वाची भूमिका लक्षात घेत नौदलाचे तळ, कार्यालयांचे परिसर तसेच निवासी  क्वार्टर्समध्ये आंतरसंवादात्मक सत्रे, व्याख्याने तसेच कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. हॅबीटॅट ट्रस्टमधील तज्ञांनी व्यापक  सहभाग आणि ज्ञानाचे सामायीकीकरण  सुनिश्चित करत प्लास्टिक प्रदूषणाचा सागरी जीवांवर होणारा विनाशकारी प्रभाव सांगणाऱ्या चर्चांचे नेतृत्व केले.
देशभरातील नौदल आस्थापनांच्या ठिकाणी एकल-वापराच्या प्लास्टिकचे निर्मुलन करण्यासाठी प्लास्टिक संकलन अभियान राबवण्यात आले. श्रमदान उपक्रमासह अनेक सामुहिक कृतींच्या माध्यमातून नौदलाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांनी स्वच्छ तसेच शाश्वत वातावरण राखण्याप्रती दृढ कटिबद्धतेचे दर्शन घडवले आहे.

भारतीय नौदलाने तटवर्ती तळांवर देशव्यापी किनारपट्टी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करून, नौदल, डीएससी तसेच संरक्षण कर्मचारी यांना त्यांच्या कुटुंबांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागाला चालना दिली आहे.  

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2134355)
Read this release in: English , Urdu , Hindi