खाण मंत्रालय
केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या हस्ते मायनिंग डॅशबोर्डचे अनावरण : लिलाव झालेल्या खनिज क्षेत्रांचे कार्यान्वयन जलद गतीने होणार
Posted On:
04 JUN 2025 7:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2025
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज मायनिंग डॅशबोर्डचे अनावरण केले. हा डॅशबोर्ड खाण मंत्रालयाने विकसित केलेले एक केंद्रीकृत डिजिटल व्यासपीठ आहे. या डॅशबोर्डवर लिलाव झालेल्या खनिज क्षेत्रांच्या कार्यान्वयन स्थितीवर देखरेख ठेवली जाणार आहे, तसेच देशभरातील वैधानिक परवानग्यांचा मागोवाही घेतला जाणार आहे. हा डॅशबोर्ड खनिज क्षेत्रात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी भारत सरकारद्वारा सुरू असलेल्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.
या मायनिंग डॅशबोर्डाचे अनावरण म्हणजे सुधारित खाण आणि खनिजे विकास आणि नियमन अधिनियम, 1957 अंतर्गत लिलाव पद्धतीला सुरवात झाल्या नंतरचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. देशात आजपर्यंत, 16 राज्यांमध्ये 500 पेक्षा जास्त खनिज क्षेत्राचा ब्लॉक्सचा यशस्वीपणे लिलाव केला गेला असून,यापैकी 466 खनिज क्षेत्रांचा लिलाव राज्य सरकारांनी केला आहे, तर 34 अत्यावश्यक खनिज क्षेत्रांचा लिलाव केंद्र सरकारने केला आहे. आत्तापर्यंत लिलाव झालेल्या खनिज क्षेत्रांपैकी 64 खनिज क्षेत्रे प्रत्यक्षात कार्यान्वित झाले आहेत.
हा डॅशबोर्डच्या माध्यमातून एका संरचित स्वरुपात आणि प्रत्यक्ष त्या त्या वेळच्या घटनाक्रमावर देखरेख ठेवता येईल अशा प्रकारची व्यवस्था आखली गेली गेली . यामुळे समस्यांची निश्चिती करणे, वेळेत उपाययोजना करणे तसेच खाणकामाच्या कार्यान्वयाचा जलदगतीने प्रारंभ करण्यात मदत होणार आहे. या डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळणारी माहिती ही त्याआधारे कृती करण्यायोग्य असेल तसेच निर्णय घेण्याच्या दृष्टीने त्याला सर्वंकष माहितीसाठ्याचा आधार मिळणार असल्याने हा डॅशबोर्ड केंद्र तसेच राज्य सरकारे, प्रकल्प प्रवर्तक (project proponents) आणि इतर भागधारकांसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून कामी येणार आहे.
हा मायनिंग डॅशबोर्ड देशांतर्गत खनिज उत्पादन वाढवण्यात, आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यात आणि भारताच्या एकूण आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
S.Patil/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133930)