ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी टीएचडीसीच्या भारतातील पहिल्या व्हेरिएबल स्पीड पंप्ड स्टोरेज प्लांट,टिहरी पीएसपीच्या पहिल्या युनिटच्या सीओडीच्या प्रारंभाचे केले कौतुक

Posted On: 04 JUN 2025 5:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2025

टीएचडीसी इंडिया लिमिटेड (टीएचडीसीआय एल) ने उत्तराखंडमधील टिहरी येथे 1000 मेगावॅट क्षमतेच्या व्हेरिअबल स्पीड पंप्ड स्टोरेज प्लांट (पीएसपी) च्या पहिल्या युनिट (२५० मेगावॅट) च्या सीओडी प्रक्रियेच्या यशस्वी प्रारंभाची घोषणा केली.

ही ऐतिहासिक कामगिरी म्हणजे भारताच्या अक्षय ऊर्जा प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे, ज्यामुळे टिहरी पीएसपी कोणत्याही केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत (सीपीएसई) सर्वात मोठा पंप्ड स्टोरेज प्लांट आणि देशातील पहिला व्हेरिअबल स्पीड पीएसपी ठरला आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात भारत सरकारचे केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या आभासी उपस्थितीत झाली.

भारत सरकारचे  केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, टिहरी येथील भारतातील पहिल्या व्हेरिएबल स्पीड पंप्ड स्टोरेज प्लांटच्या पहिल्या युनिटचे यशस्वी ऑपरेशन ही केवळ टी एच डी सी आय एलची तांत्रिक कामगिरी नाही तर भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक धाडसी पाऊल आहे.

या प्रकल्पामुळे आमची ग्रिड स्थिरता लक्षणीयरीत्या मजबूत होईल आणि अक्षय ऊर्जेच्या एकात्मिकतेला पाठिंबा मिळेल. परिवर्तनशील गती तंत्रज्ञानामुळे आम्हाला वीज प्रवाह अचूकतेने व्यवस्थापित करता येतो, ज्यामुळे आमची ऊर्जा परिसंस्था अधिक स्मार्ट आणि लवचिक बनते.

केंद्रीय मंत्र्यांनी संपूर्ण टीएचडीसीआय एल पथक, अंमलबजावणी भागीदार आणि या ऐतिहासिक यशात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन केले.

हा प्रकल्प ऑफ-पीक अतिरिक्त ऊर्जेचे पीकिंग पॉवरमध्ये रूपांतर करण्यासाठी, ग्रिड लवचिकता वाढविण्यासाठी तसेच चोवीस तास वीज उपलब्धतेला सहाय्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. लवचिक पीकिंग पॉवर आणि क्रिटिकल ग्रिड बॅलन्सिंग सपोर्ट प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले, टिहरी व्हेरिअबल स्पीड पीएसपी हे भारताच्या अखंडित अक्षय ऊर्जेचे व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेतील एक महत्त्वपूर्ण झेप असल्याचे दर्शवते. 

या कार्यान्वित टप्प्यामुळे अत्याधुनिक जलविद्युत उपाययोजनांमधील टीएचडीसीआय एल चे नेतृत्व पुन्हा सिद्ध होते आणि जागतिक स्तरावर भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या अधिकाराला बळकटी मिळते. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि नियंत्रणे, 250 मेगावॅट व्हेरिएबल-स्पीड पंप्ड स्टोरेज हायड्रोपॉवर युनिटसह, जीई व्हर्नोव्हा द्वारे उपलब्ध केले गेले आहेत. जीई व्हर्नोव्हा ही एक जागतिक ऊर्जा कंपनी आहे जी जलविद्युत वापरण्यासाठी तसेच विश्वसनीय ऊर्जा उपाय प्रदान करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची निर्मिती करते.

या प्रसंगी टीएचडीसीआय एल चे कार्यकारी संचालक (टिहरी कॉम्प्लेक्स) एल.पी. जोशी, टीएचडीसीआय एलचे वरिष्ठ अधिकारी आणि जीई व्हर्नोव्हा, एचटीसी आणि वीज क्षेत्रातील इतर प्रमुख भागधारकांचा समावेश असलेल्या प्रकल्प संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

S.Patil/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2133873)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil