विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तंत्रज्ञान विकास मंडळाकडून संरक्षणासाठी ‘मेटा तत्व सिस्टिम्स’ ने विकसित केलेल्या मल्टी-स्पेक्ट्रल कॅमोफ्लाजच्या स्वदेशी प्रणालीला समर्थन
Posted On:
04 JUN 2025 5:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2025
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान विकास मंडळाने नवी दिल्ली येथील मेसर्स मेटा तत्व सिस्टीम्स यांना धोरणात्मक संरक्षण अनुप्रयोगांसाठी ‘मल्टी-स्पेक्ट्रल कॅमोफ्लाज’ प्रणाली निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ दिले आहे.

या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट मेटामटेरियल सरफेस क्लोकिंग सिस्टम (MSCS) चे व्यावसायिकीकरण करणे आहे.ही प्रणाली सेन्सर्स आणि पाळत ठेवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर मालमत्तेची दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी करते, त्याची मदत युद्धभूमीवर काही गोष्टी लपविण्यासाठी फायदा मिळतो.
एमएससीएस या प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे आयआयटी कानपूरने बौध्दिक स्वामित्व घेतले आहे. आणि या प्रणालीची निर्मिती पूर्णपणे देशामध्येच तंत्रज्ञान विकास मंडळाच्या पाठिंब्याने केली जाणार आहे. या प्रणालीमध्ये वापरण्यात येणारी सामग्री वजनाने अतिशय हलकी, तसेच पाणी आणि आग रोधक आहे
या कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, ज्येष्ठ संशोधक, तसेच लष्कराच्या तीनही दलांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मेटा तत्वबरोबर झालेल्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. या प्रसंगी बोलताना, टीडीबीचे सचिव राजेश कुमार पाठक यांनी सांगितले, "भारताची धोरणात्मक ताकद केवळ प्रगत शस्त्रास्त्रांमध्ये नाही, तर आपण आपल्या महत्त्वाच्या मालमत्ता किती प्रभावीपणे लपवू शकतो आणि त्यांचे संरक्षण करू शकतो हे देखील तितकेच महत्वाचे आहे. मेटा तत्वकडून तयार केलेली कार्यप्रणाली यासाठी संरक्षण विभागाला खूप उपयोगी ठरणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.
संरक्षण विभागासाठी कार्यप्रणाली बनविण्यासाठी टीडीबी म्हणजे तंत्रज्ञान विकास मंडळाकडून दिलेल्या या पाठिंब्याबद्दल आभार मानताना, मेसर्स मेटा तत्व सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि सीईओ एअर व्हाइस मार्शल प्रवीण भट्ट (निवृत्त) म्हणाले,"टीडीबीच्या महत्त्वपूर्ण पाठिंब्याने, आम्ही एका अत्याधुनिक संकल्पनेचे औद्योगिक वास्तवात रूपांतर करत आहोत. आमचे लक्ष जागतिक दर्जाच्या, लढाऊ-सज्ज आणि पूर्णपणे स्वदेशी ‘मल्टी-स्पेक्ट्रल कॅमफ्लाज सिस्टम’ प्रदान करण्यावर आहे. यामुळे भारतीय सशस्त्र दलांना आणि सहयोगी भागीदारांना निर्णायक कार्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध फायद्यांसह सक्षम करत आहे."
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133864)