संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एअर मार्शल जसवीर सिंह मान एव्हीएसएम, व्हीएम यांनी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडच्या वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर म्हणून स्वीकारला कार्यभार

Posted On: 01 JUN 2025 11:48AM by PIB Mumbai

 

एअर मार्शल जसवीर सिंग मान यांनी 01 जून 2025 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडचे वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर म्हणून कार्यभार स्वीकारला. एअर मार्शल मान हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. 16 डिसेंबर 1989 रोजी त्यांना भारतीय वायू दलात लढाऊ पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना प्रामुख्याने विविध प्रकारच्या लढाऊ विमानात 3000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. ते एक पायलट अटॅक इन्स्ट्रक्टर आहेत आणि त्यांच्या ऑपरेशनल कारकिर्दीत त्यांनी एका लढाऊ स्क्वाड्रनचे नेतृत्व केले आहे, एका फॉरवर्ड बेसचे मुख्य ऑपरेशन्स ऑफिसर आणि एका प्रीमियम लढाऊ तळाचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून काम केले आहे. त्यांनी वायू सेना मुख्यालय आणि कमांड मुख्यालयात विविध महत्त्वाच्या पदांवर देखील काम केले आहे. 2017 मध्ये एअर मार्शल मान यांनी सिंगापूर प्रजासत्ताक हवाई दल आणि 2018 मध्ये यूएसएएफ सोबत संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी सेंट्रल एअर कमांडचे वरिष्ठ अधिकारी-प्रभारी प्रशासन आणि वायू सेना संरक्षण कमांडर या पदांवर काम केले. एअर मार्शल मान हे प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज, लंडन (यूके) चे माजी विद्यार्थी देखील आहेत.

भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते वायू सेना मुख्यालयात महासंचालक (शस्त्र प्रणाली) होते. वायू सेना अधिकारी मान यांना 'अति विशिष्ट सेवा पदक' आणि 'वायू सेना पदक' या राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

***

S.Tupe/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2133120) Visitor Counter : 2