संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक क्षेत्रातील तीन संरक्षण उपक्रमांना मिनीरत्न दर्जा


मुनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल), आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड (एव्हीएनएल) आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड (आयओएल) आता मिनीरत्न

Posted On: 29 MAY 2025 8:32PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली – दि. 29 मे, 2025

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण विषयक सामुग्रीचे उत्पादन करणा-या सार्वजनिक क्षेत्रातील तीन उपक्रमांना ‘मिनीरत्न’ श्रेणी -1 असा दर्जा दिला आहे. यामध्‍ये मुनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल), आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड (एव्हीएनएल) आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड (आयओएल) या कंपन्यांचा समावेश आहे. तीन वर्षांच्या अल्पावधीत सरकारी संस्थेपासून नफा कमावणाऱ्या कॉर्पोरेट संस्थेत रूपांतरित झाल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे अभिनंदन केले. कंपनीची उलाढाल वाढवण्यासाठी, स्वदेशीकरण जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी आणि मिनीरत्न (श्रेणी-1) दर्जा मिळवण्यासाठी तसेच इतर कामगिरी निकषांची पूर्तता करण्यासाठी एमआयएल, एव्हीएनएल आणि आयओएलच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या पुढाकारांबद्दल संरक्षण मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

स्थापनेनंतर म्युनिशन्स इंडिया लिमिटेडने महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. या कंपनीने 2021-22 मध्ये 3314 कोटी रुपयांवरून आपले उत्पन्न 200 % पेक्षा अधिक वाढवत 2024-25 मध्ये 8214 कोटी रुपयांवर नेले आहे. निर्यातीच्या बाबतीत, एमआयएलने 2021-22 मध्ये 22.55 कोटी रुपयांवरून 2024-25 मध्ये 3081 कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. एमआयएलच्या प्रमुख उत्पादनांमध्ये लहान, मध्यम आणि उच्च क्षमतेचा दारूगोळा, मोर्टार, रॉकेट, हँडग्रेनेड इत्यादींचा समावेश आहे. तर इनिशिएटरी कंपोझिशन, प्रोपेलेंट्स आणि उच्च स्फोटकांच्या कंपनी अंतर्गत उत्पादन करण्यात आले आहे.

आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेडने 2021-22 मध्ये 2569.26 कोटी रुपयांवरून 2024-25 मध्ये विक्रीत सुमारे 190% वाढ नोंदवत 4946 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. एव्हीएनएल ने T-72, T-90 आणि BMP-II या तिन्ही प्लॅटफॉर्मसाठी आवश्यक इंजिनाचे 100% स्वदेशीकरण साध्य केले आहे. एव्हीएनएल च्या प्रमुख उत्पादनांमध्ये शस्त्रसज्ज / लढाऊ वाहने (T-90, MBT अर्जुन, इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्स 'BMP-II सारथ' इ.), मदत करणारी वाहने (MPV, AERV इ.) आणि डिफेन्स मोबिलिटी सोल्यूशन्स (स्टॅलियन, LPTA इ.) यांचा समावेश आहे.

गेल्या तीन वर्षांत इंडिया ऑप्टेल लिमिटेडने 2021-22 मधील 562.12 कोटी रुपयांची विक्री 250% हून अधिक वाढवत 2024-25 या आर्थिक वर्षात 1541.38 कोटी रुपयांपर्यंत (तात्पुरती) वाढवली आहे. आयओएलच्या मुख्य उत्पादनांमध्ये ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आणि व्हिजन उपकरणे समाविष्ट आहेत जी जमिनीवरील प्लॅटफॉर्म आणि रणगाडा T-90, T-72, इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल बीएमपी-II, तोफा, नौदल तोफा इत्यादी शस्त्रांमध्ये वापरली जातात.

***

S.Bedekar/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2132818)
Read this release in: English , Urdu , Hindi