ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली भारतीय मानक ब्युरोच्या प्रशासकीय समितीची नववी बैठक
Posted On:
29 MAY 2025 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2025
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) च्या प्रशासकीय समितीची नववी बैठक पार पडली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात, केंद्रीय मंत्री म्हणाले की, ‘बीआयएस’ ने दागिन्यांच्या अनिवार्य हॉलमार्किंग योजनेअंतर्गत देशातील 371 जिल्ह्यांना आणले आहे; ज्यामुळे ग्राहकांना गुणवत्तेची हमी मिळते. येत्या वर्षात आणखी जिल्हे या योजनेअंतर्गत जोडण्याचे निर्देश त्यांनी दिले. उद्योग आणि इतर संबंधितांना BIS उपक्रमांबद्दल अधिक जागरूक करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
अशाप्रकारच्या लघु उद्योगांना सहाय्य करण्यासाठी आणि तांत्रिक नियमांचे पालन करण्याविषयी त्यांची तयारी सुनिश्चित करण्यासाठी एमएसएमई क्षेत्राने अधिक पुढाकार घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. बीआयएसच्या शाखा कार्यालयांच्या पातळीवर होत असलेल्या मानक मंथन आणि मानक संवाद सारख्या उपक्रमांची प्रशंसा करून, त्यांनी उद्योगांनी एकमेकांसोबत काम करावे, सुलभता ठेवावी आणि लघु उद्योगांना येणाऱ्या कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करावे यावर भर दिला. नियामक प्रणाली मजबूत करण्यासाठी, बीआयएसने कोणत्याही गैरप्रकारांना सहनशीलता दाखवता कामा नये यावर त्यांनी जोर दिला.
हे समग्र प्रयत्न भारताला मानकीकरणात जागतिक आघाडीवर उच्च स्थान मिळवून देण्यास मदत करतील, असे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
S.Bedekar/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2132445)