संरक्षण मंत्रालय
सबळ या सहाव्या 25 टनी बोलार्ड पुल टग(340 यार्ड)चे उद्घाटन
Posted On:
28 MAY 2025 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2025
27 मे 2025 रोजी कोलकाता येथील मेसर्स टीआरएसएल येथे सबळ या सहाव्या 25 टनी बोलार्ड पुल (बीपी) टगचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोलकाता येथील डब्ल्यूपीएसचे कमांडर एस श्रीकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ही जहाजे दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी कोलकाता येथील मेसर्स टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड (टीआरएसएल) यांच्याशी झालेल्या सहा (06) 25 टनी बीपी टगच्या बांधणी कराराचा भाग आहेत. हे टग स्वदेशी पद्धतीने संरेखन करून भारतीय नौदल नोंदणी (आयआरएस) रजिस्टरमधील संबंधित नौदल नियम आणि नियमनानुसार बांधण्यात आले आहेत.
संबंधित जहाजबांधणी कंपनीने आतापर्यंत यापैकी पाच टग्ज यशस्वीरित्या हस्तांतरित करून दिले असून भारतीय नौदलातर्फे मर्यादित पाण्यातील बर्थिंग,अन-बर्थिंग किंवा नौकानयन यांच्या दरम्यान नौदलाच्या जहाजांना तसेच पाणबुड्यांना मदत करण्यासाठी यांचा वापर केला जात आहे. हे टग्ज दुसऱ्या जहाजांच्या शेजारी तरंगत असताना किंवा नांगरलेले असताना अग्निशमन मदत देखील उपलब्ध करून देऊ शकतात तसेच या जहाजांमध्ये मर्यादित प्रमाणात शोध आणि बचाव कार्य करण्याची क्षमता देखील आहे.
हे टग्ज भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे अभिमानी ध्वजवाहक आहेत.
(1)E27P.jpg)
CY48.jpg)
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2132151)