दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ट्रायने 6 गिगाहर्ट्झ (निम्न), 7 गिगाहर्ट्झ, 13 गिगाहर्ट्झ, 15 गिगाहर्ट्झ, 18 गिगाहर्ट्झ, 21 गिगाहर्ट्झ बँड्स, ई बँड आणि व्ही- बँड यांतील मायकोवेव्ह स्पेक्ट्रम वितरणाशी संबंधित सल्लागार पत्रक जारी केले
Posted On:
28 MAY 2025 4:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2025
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय- ट्राय) आज 6 गिगाहर्ट्झ (जीएचझेड), 7 गिगाहर्ट्झ, 13 गिगाहर्ट्झ, 15 गिगाहर्ट्झ, 18 गिगाहर्ट्झ, 21 गिगाहर्ट्झ बँड्स, ई बँड आणि व्ही- बँड यांतील मायकोवेव्ह स्पेक्ट्रम वितरणाशी संबंधित सल्लागार पत्रक जारी केले आहे.
यापूर्वी, केंद्रीय दूरसंचार विभागाने (डीओटी) दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे ट्रायला ई आणि व्ही बँड्समधील स्पेक्ट्रम वितरण तसेच मायकोवेव्ह पोहोच (एमडब्ल्यूए) आणि 6/ 7/ 13/ 15/ 18/ 21 गिगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सी बँड्स मधील मायकोवेव्ह बॅकबोन (एमडब्ल्यूबी)स्पेक्ट्रम च्या वितरणाबाबत शिफारसी करण्याची विनंती केली होती.
दरम्यान, डिसेंबर 2023 मध्ये दूरसंचार नियम, 2023 लागू करण्यात आला. या नियमातील तरतुदींच्या पार्श्वभूमीवर, दूरसंचार सेवांच्या रेडिओ बॅकहौलसंदर्भात ट्रायने 20 फेब्रुवारी 2024 रोजी पाठवलेल्या पत्राच्या माध्यमातून दूरसंचार विभागाला (डीओटी) असे कळवले की, “डीओटीने 12 ऑगस्ट 2022 रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे (अ) ई आणि व्ही बँड्समधील स्पेक्ट्रम लिलावाची पद्धत आणि (ब) एमडब्ल्यूए आणि एमडब्ल्यूबी मधील 6/ 7/ 13/ 15/ 18/ 21 गिगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सी बँड्सच्या आरएफ च्या कॅरियर च्या पद्धतीवर केलेल्या शिफारसींच्या मागणीनुसार डीओटी ने आढावा घेणे आवश्यक आहे. म्हणून या विषयावर कोणत्या विशिष्ट मुद्द्यांवर ट्रायच्या शिफारसी हव्या आहेत ते डीओटीने सांगावे अशी विनंती करण्यात आली आहे.
याला उत्तर म्हणून डीओटी ने दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी पाठवलेल्या नव्या पत्रात बॅकहौल स्पेक्ट्रम ची वितरणपद्धत प्रशासकीय असून दूरसंचार नियम, 2023 च्या पहिल्या कार्यक्रमाचा हा भाग आहे या ट्रायच्या निरीक्षणाला दुजोरा देत ट्राय कायदा, 1997च्या विभाग 11 (1)(अ) अंतर्गत ट्रायला खालील पैलूंबाबत शिफारसी मागवल्या आहेत:
पुढील गोष्टींसाठी मागणी असेसमेंट आणि सेवा/वापराची व्याप्ती (i) 57-64/ 66 गिगाहर्ट्झ (V- बँड) आणि (ii) 71-76 गिगाहर्ट्झ / 81-86 गिगाहर्ट्झ (E- बँड) तसेच ट्रायने ठरवलेल्या सेवा/वापर व्याप्तीच्या निर्णयानुसार म्हणजेच “एक्सेस” किंवा “बॅकहौल” किंवा “एकत्रित एक्सेस आणि बॅकहौल (आयएबी)”नुसार स्पेक्ट्रम वितरणाच्या पद्धती आणि संबंधित नियम व अटी
स्पेक्ट्रम शुल्क आणि व्यावसायिक दूरसंचार सेवांच्या बॅकहौल उद्देशासाठी 6 (निम्न)/ 7/ 13/ 15/ 18/ 21 गिगाहर्ट्झ या बँड्सच्या वितरणासाठी स्पेक्ट्रम मायदा, कॅरियर एकत्रीकरण इत्यादींसारख्या संबंधित नियम व अटी
डब्ल्यूआरसी-2027 नंतर आयएमटीचा वापर करून 7/15 गिगाहर्ट्झ बँड्स लक्षात घेत या बँड्सच्या वापराच्या संदर्भात आढाव्याची कोणतीही आवश्यकता
व्यावसायिक दूरसंचार सेवांच्या सर्वदूर जोडणीसाठी (फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस) नेमलेले स्पेक्ट्रमचे क्वांटम/ बँड्स आणि स्पेक्ट्रमच्या वितरणाची पद्धत आणि वरील 2.2 उताऱ्यात नॉन-आयएमटी बँड्समध्ये दिल्यानुसार संबंधित नियम व अटी
बिगर-व्यावसायिक/कॅप्टीव्ह वापरासाठी बॅकहौलकरिता राखीव स्पेक्ट्रमचे क्वांटम/ बँड्स आणि वरील 2.3 उताऱ्यात नॉन-आयएमटी बँड्समध्ये दिल्यानुसार संबंधित नियम व अटी
दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी जारी पत्रकातील उतारा 4(ड) मधील संदर्भानुसार व्ही- बँड मधील परवाना-सूट आधारावर कमी क्षमता, इनडोर, ग्राहक उपकरण ते ग्राहक उपकरण वापर यासाठी व्यवहार्यता तसेच तांत्रिक मापदंड.
वरील (अ) आणि (फ) अंतर्गत निर्देशित कारणांसाठी योग्य ठरणाऱ्या कोणत्याही इतर शिफारसी देणे
या संदर्भात, भागधारकांकडून सूचना तसेच विरोधी सूचना मिळवण्यासाठी 6 गिगाहर्ट्झ (निम्न), 7 गिगाहर्ट्झ, 13 गिगाहर्ट्झ, 15 गिगाहर्ट्झ, 18 गिगाहर्ट्झ, 21 गिगाहर्ट्झ बँड्स, ई बँड आणि व्ही- बँड यांतील मायकोवेव्ह स्पेक्ट्रम वितरणाशी संबंधित सल्लागार पत्रक ट्रायच्या संकेतस्थळावर (www.trai.gov.in) जाहीर करण्यात आले आहे. तसेच सल्लागार पत्रकात दिलेल्या मुद्द्यांबाबत भागधारकांनी लिखित स्वरूपातील त्यांच्या सूचना 25 जून 2025 पर्यंत आणि विरोधी सूचना 9 जुलै 2025 पर्यंत पाठवण्यास सांगितले आहे.
सूचना तसेच विरोधी सूचना प्राधान्यतः इलेक्ट्रॉनिक स्वरुपात advmn@trai.gov.in येथे पाठवाव्यात. यासंबंधी कोणतेही स्पष्टीकरण/ माहिती मिळवण्यासाठी ट्रायचे सल्लगार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना) अखिलेश कुमार त्रिवेदी यांच्याशी +91-11-20907758 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2132036)