इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय ओळख प्राधिकरणाने पारदर्शिता व संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बिगर वैयक्तिक आधार डॅशबोर्ड डेटा केला प्रकाशित

Posted On: 19 MAY 2025 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2025


भारतीय ओळख प्राधिकरणाने खुला सरकारी माहिती मंच data.gov.in वर आधार डॅश बोर्डवरील बिगर वैयक्तिक अनामिक तपशील सामयिक करण्यास सुरुवात केली आहे.

पारदर्शिता,संशोधन यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि माहिती आधारित धोरण आखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.  

प्रमुख डाटा  अधिकारी आणि भारतीय ओळख प्राधिकरणाच्या उप महासंचालकांनी प्रकाशित केलेल्या माहिती संचात आधार नोंदणीबाबतची, अद्ययावतीकरणाबाबतची व अधिकृतता तपासण्याच्या पद्धतींची  एकत्रित माहिती समाविष्ट आहे. त्याचे वर्गीकरण भौगोलिकता, वयोगट व अन्य संबंधित मानकांनुसार करण्यात आले आहे.  

ही सामुहिक व अनामिक माहिती उपलब्ध करुन देऊन शैक्षणिक संशोधनाला मदत करण्याचा, डिजिटल सेवांमध्ये नवोन्मेषाचा आणि सामुहिक विकास करण्याचा भारतीय ओळख प्राधिकरणाचा हेतू आहे.  

या उपक्रमामुळे वास्तविकतेवर आधारित धोरण निर्मिती व तंत्रज्ञानातील नवोन्मेष, भारतीय ओळख प्राधिकरणाची पारदर्शकतेबाबतची वचनबद्धता वाढविणे, लोक कल्याण यासाठीचे नवे मार्ग खुले झाले आहेत.

वास्तविकतेवर आधारित धोरण निर्मितीबाबतचा सरकारचा व्यापक दृष्टीकोन आणि लोक कल्याणासाठी खुल्या माहितीच्या मूल्यांकनात जास्तीत जास्त वृद्धी यानुसारच हा उपक्रम आखण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पुढील काळात डिजिटल समावेशकता व प्रशासकीय कार्यक्षमता यांना चालना मिळणे अपेक्षित आहे.

N.Chitale/S.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2129765)