नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रणासाठीचा मनोरा,तांत्रिक संचालन इमारत आणि अग्निशमन विभाग या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधा केंद्राचे उद्घाटन


देशातील प्रत्येक प्रदेशाला आधुनिक आणि सर्वसमावेशक विमान वाहतूक विषयक पायाभूत सुविधांचा लाभ मिळेल याची सुनिश्चिती करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध : मुरलीधर मोहोळ

Posted On: 15 MAY 2025 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 0225

केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज कोल्हापूर विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रणासाठीचा मनोरा (एटीसी टॉवर) तांत्रिक संचालन इमारत (टेक्निकल ब्लॉक) अग्निशमन विभाग (फायर स्टेशन) या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधा केंद्राचे उद्घाटन केले तसेच कोल्हापूर आणि नागपूर दरम्यानच्या स्टार एअरच्या पहिल्या विमान उड्डाणाला हिरवा झेंडाही दाखवला. यामुळे ही घडामोड महाराष्ट्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकास प्रक्रियेतील एक महत्त्वाचा क्षण ठरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाअंतर्गत तसेच केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली हे सुधारणात्मक अद्ययावतीकरण केले गेले आहे. हवाई सुरक्षा वाढवणे, आपत्कालीन सेवांना बळकटी देणे आणि महाराष्ट्रात  प्रादेशिक स्तरावरील हवाई जोडणी व्यवस्था अधिक मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे. आपले स्नेहपूर्ण  स्वागत केल्याबद्दल मोहोळ यांनी  कृतज्ञता व्यक्त केली. देशातील प्रत्येक प्रदेशाला आधुनिक आणि सर्वसमावेशक विमान वाहतूक विषयक पायाभूत सुविधांचा लाभ मिळेल याची सुनिश्चिती करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

कोल्हापूर मतदारसंघाचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, हवाई उड्डाण मार्गदर्शन सेवा आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे  सदस्य एम. सुरेश, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार अमलजी महाडिक, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.


N.Chitale/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2128973)
Read this release in: English , Urdu , Hindi