संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन (IMDEX) - 2025

प्रविष्टि तिथि: 07 MAY 2025 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2025

 

भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस किल्टन सिंगापूर येथील चांगी प्रदर्शन केंद्रात आयोजित,आयएमडीईएक्स-आशिया-2025 या आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी सिंगापूरमध्ये पोहोचले.

भारतीय नौदलाच्या तैनातीच्या कार्यवाहीचा  एक भाग म्हणून आणि भारत आणि सिंगापूरमधील मजबूत सागरी भागीदारी अधोरेखित करण्यासाठी हे जहाज येथे भेटीसाठी आले  आहे.

या भेटीदरम्यान, जहाजांवरील कर्मचारी विविध द्विपक्षीय/बहुपक्षीय उपक्रमांच्या मालिकेत सहभागी होतील, ज्यामध्ये सिंगापूर प्रजासत्ताक नौदल आणि IMDEX आशिया 2025 यांच्यातील तसेच इतर सहभागी नौदलांसोबत व्यावसायिक देवाणघेवाण समाविष्ट आहे.

या सहभागाचे उद्दिष्ट नौदल सहकार्य मजबूत करणे, परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि दोन्ही नौदलांमधील परस्पर सामंजस्य वाढवणे हे आहे.

सागरी सुरक्षा आणि भारताच्या नौदल वारशाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय मुलांसाठी मार्गदर्शनपर भेटी, सहभागी नौदलांसोबत क्रॉस डेक भेटी आणि संरक्षण उद्योगांसाठी विशेष अधिरक्षित भेटींचे नियोजन केले आहे.

भारतीय नौदलाची प्रादेशिक सुरक्षा, स्थैर्य आणि भारत आणि सिंगापूर या दोन सागरी भागीदारांमधील दीर्घकालीन मैत्रीच्या वचनबद्धतेलाही ही भेट अधोरेखित करते.

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2127535) आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil