अंतराळ विभाग
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 'जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद – ग्लेक्स 2025' चे होणार उद्घाटन
Posted On:
06 MAY 2025 6:15PM by PIB Mumbai
12 व्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचे (ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स - ग्लेक्स 2025) आयोजन भारतात 7 ते 9 मे 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे.
“रिचिंग न्यू वर्ल्डस : ए स्पेस एक्सप्लोरेशन रेनेसान्स” या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय जागतिक परिषदेचे उद्घाटन अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

या परिषदेच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जितेंद्र सिंह यांनी मागील दशकात भारताने जागतिक अंतराळ क्षेत्रात घेतलेल्या आघाडीबाबत भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ही परिवर्तनशील वाटचाल शक्य झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
ही परिषद इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (आयएएफ), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) (आयोजक संस्था) आणि ऍस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) (सह-आयोजक संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. ग्लेक्स 2025 ही भारताच्या जागतिक अंतराळ क्षेत्रातील नेतृत्वाचा आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

2010 पासून आयोजित करण्यात येणाऱ्या या परिषदेने आंतरराष्ट्रीय संवाद, सहकार्य आणि नवोन्मेषासाठी एक अग्रगण्य मंच म्हणून स्थान मिळवले आहे. यावर्षीच्या ग्लेक्स 2025 परिषदेमध्ये सहभागी झालेल्यांच्या नोंदणीचे आकडे ऐतिहासिक असून, 36 देशांतील 233 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना धरून एकूण 1800 हून जास्त प्रतिनिधी यात सहभागी होत आहेत.

यंदाच्या परिषदेकरिता 57 देशांतील 1,275 अब्स्ट्रॅक्टस (संशोधन लेखाची सारपत्रिका) सादर करण्यात आले आहेत – हे आयएएफच्या इतिहासात सर्वाधिक आहेत.
***
S.Kakade/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2127337)