खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये खाणकाम क्षेत्रात विक्रमी उत्पादनाची नोंद


महत्त्वाची खनिजे आणि बिगर-लोह धातूंच्या उत्पादनात लक्षणीय वाढ

Posted On: 05 MAY 2025 2:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2025

 

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये विक्रमी उत्पादनाची पातळी गाठल्यानंतर, आता पुन्हा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशातील काही प्रमुख खनिजांच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. खनिज संरक्षण आणि विकास नियमावलीनुसार (MCDR-Mineral Conservation and Development Rules) खनिज उत्पादनात लोह खनिजाचा वाटा 70% इतका आहे.

तात्पुरत्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये लोह खनिजाचे विक्रमी 289 दशलक्ष मेट्रिक टन  इतके उत्पादन झाले आहे, जे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नोंदवलेल्या 277 दशलक्ष मेट्रिक टनाच्या उत्पादनाच्या तुलनेत 4.3% ने जास्त आहे. त्याचप्रमाणे, मँगनीजच्या उत्पादनाने देखील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नोंदवलेला 3.4 दशलक्ष मेट्रिक टनाचा उत्पादन विक्रम मोडला असून, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उत्पादन 11.8% ने वाढून ते 3.8 दशलक्ष मेट्रिक टन झाले आहे. बॉक्साईटचे उत्पादनात देखील आर्थिक वर्ष 2023-24 मधील 24 दशलक्ष मेट्रिक टनउत्पादनात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 2.9% ची वाढ होऊन ते 24.7 दशलक्ष मेट्रिक टन इतके झाले आहे. याच काळात, शिसे  (lead concentrate) उत्पादनही 3.1% ची वाढ नोंदवत 381 हजार टन (THT) वरून 393 हजार टनापर्यंत वाढले  आहे.

बिगर-लोह धातू क्षेत्रात, प्राथमिक ॲल्युमिनियमच्या आर्थिक वर्ष 2024-25 उत्पादनाने आर्थिक वर्ष 2023-24 मधील उत्पादन विक्रम मोडला आहे. प्राथमिक ॲल्युमिनियमचे उत्पादन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 41.6 लाख टन  होते. ते आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 42 लाख टनापर्यंत वाढले. रिफाईन्ड कॉपरच्या उत्पादनाताही 12.6% ची मोठी वाढ झाली असून ते आर्थिक वर्ष 2023-24 मधील 5.09 लाख टनाच्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 5.73 लाख टनापर्यंत वाढले आहे.

भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा ॲल्युमिनियम उत्पादक देश आहे, तसेच रिफाईन्ड कॉपरच्या बाबतीतही पहिल्या 10 मोठ्या उत्पादकांपैकी आणि लोह खनिजांच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे. चालू आर्थिक वर्षात लोह खनिजाच्या उत्पादनातील सातत्यपूर्ण वाढीतून, पोलाद उद्योगासारख्या वापरकर्त्या उद्योगांमधील मोठी मागणी ठळकपणे अधोरेखित होते. याचबरोबरीने ॲल्युमिनियम आणि तांब्याच्या उत्पादनातही झालेली वाढ पाहता, त्यातून ऊर्जा, पायाभूत सुविधा, बांधकाम, ऑटोमोटिव्ह आणि यांत्रिक या आणि अशा वापरकर्ता क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण मोठ्या आर्थिक उलाढाली होत असल्याचे दिसून येते.

 

* * *

S.Bedekar/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127006) Visitor Counter : 17
Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi