माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ओटीटी ची पुढील झेप: कृत्रिम प्रज्ञा, संवादात्मकता आणि वैयक्तिकरण यामुळे ‘स्ट्रीमिंग’ च्या भविष्याला आकार
वेव्हज 2025 मधील परिसंवादात भारतातील डिजिटल मनोरंजन क्षेत्रामध्ये आशयनिर्मितीच्या प्रवासाची तंत्रज्ञानामुळे होत असलेली पुनर्व्याख्या या विषयावर चर्चा
Posted On:
03 MAY 2025 10:30PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 3 मे 2025
वेव्हज 2025 मध्ये "ओटीटी क्रांती: कृत्रिम प्रज्ञा, वैयक्तिकीकरण परस्परसंवादी आशयामुळे ‘स्ट्रीमिंग’च्या परिदृष्यात होत असलेला बदल" या विषयावरील परिसंवादात सहभागांनी अत्यंत उत्साहाने सहभागी होत या विषयीचे आपले दृष्टिकोन मांडले. या परिसंवादात स्ट्रीमिंग उद्योगातील अत्यंत ख्यातनाम व्यक्तींना एकत्र आणण्यात आले. लायन्सगेट प्ले एशियाचे अध्यक्ष रोहित जैन यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले, यामध्ये कृत्रिम प्रज्ञा आणि परस्परसंवादी पद्धतीमुळे कथा सांगणे, त्या पोहोचवणे आणि एकंदर अनुभव या गोष्टींना नवा आकार येत असल्याने भारताच्या कथाकथनाचा प्रदीर्घ वारशाचे कशा प्रकारे प्रभावी परिवर्तन होत आहे, या विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली
सत्राची सुरुवात करताना, रोहित जैन यांनी भारताच्या कथाकथनाच्या वारशाबद्दल गौरवोद्गार व्यक्त करत सध्या त्यामध्ये होत असलेल्या आकर्षक बदलावर आणि आपण केवळ जे पाहतो तेच नाही तर आपण कथांच्या माध्यमातून आपण कसे जोडले जात आहोत यामध्येही तंत्रज्ञान बदल घडवत आहे, यावर भाष्य केले.
आशिया पॅसिफिक आणि MENA चे उपाध्यक्ष गौरव गांधी, यांनी वैयक्तिकरण ही बहुपदरी प्रक्रिया असल्याचे सांगितले. "आम्ही प्रेक्षकांना काय हवे आहे ते - त्यांचे मूड, त्यांच्या अभिरुचीचे नमुने समजून घेण्यापासून सुरुवात करतो. आणि आपल्यासारख्या बहुभाषिक देशात, भाषिक शोध घेण्याचाही त्यामध्ये आहे," ते म्हणाले.

मोनिका शेरगिल यांनी आजच्या आशय परिदृष्याचे मानवी इतिहासातील पहिले - सर्जनशीलता आणि मशीन लर्निंगचे अभिसरण अशा शब्दात वर्णन केले. "तुम्ही क्राईम थ्रिलर्स पाहण्याच्या इच्छेने येता , परंतु ट्रेंडिंग काय आहे ते देखील तुम्ही पाहता. सामायिक सांस्कृतिक नाडी तयार करताना प्रेक्षकांचे समाधान करणे हे देखील उद्दीष्ट आहे," त्या म्हणाल्या.
भरत राम म्हणाले, प्रेक्षकांच्या वर्तणुकीच्या खुणा उमटलेल्या असतात. "बहुतेक लोक, शेरलॉक होम्सच्या संशयितांप्रमाणे, जेव्हा प्लॅटफॉर्मला भेट देतात तेव्हा ते त्यांच्या काही खुणा मागे सोडून जातात. आम्ही त्या खुणांवरून — प्रादेशिक, निश, लोकप्रिय अशापैकी त्यांना गुंतवून ठेवणाऱ्या " आशयाची शिफारस करतो, असे त्यानी नमूद केले.
चर्चेचा विषय नंतर कथाकथनाकडे वळला. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे एमडी आणि सीईओ गौरव बॅनर्जी यांनी एका चांगल्या कथेमध्ये असलेल्या दीर्घकाळ ठसा उमटवणाच्या ताकदीचा उल्लेख केला. "जेव्हा एखादी गोष्ट त्या क्षणासोबत प्रतिध्वनित होते, तेव्हा प्रेक्षकांना ती आठवते. कथा आणि कथाकारांनी प्रेक्षकांची नाडी ओळखून तो सांस्कृतिक क्षण नेमका कसा टिपता येईल हे ओळखणे हे ब्लॉकबस्टर्सवरील विश्वासाचे मर्म आहे," असे त्यांनी उद्योगातील मंदीचा सामना करणाऱ्या स्वदेशी चित्रपटांच्या यशाचा संदर्भ देत नमूद केले.
एक रेषीय स्वरूपापासून निर्मात्याच्या नेतृत्वाखालील परिसंस्थेपर्यंतच्या झालेल्या नाट्यमय बदलाबद्दल आपले मत व्यक्त करताना नीरज रॉय यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अभिसरणावर प्रकाश टाकला. "संगीत व्हिडिओंपासून ते आशयनिर्मात्यांच्या अफाट विश्वापर्यंत, यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मने सर्व काही बदलून टाकले आहे. आता, जनरेटिव्ह तंत्रज्ञानासह, आपण त्याहून मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत," असे ते म्हणाले.

संभाषण नंतर परस्परसंवादात्मकतेकडे वळले. गौरव गांधी यांनी, प्राइम व्हिडिओ संवादात्मक वैशिष्ट्यांचा वापर करते. त्यामुळे कथेला बाधा येण्याऐवजी ते अधिक परिणामकारक होते,असे नमूद केले. “तुम्हाला चाहत्यांच्या प्रवासात कधीही जास्त नव्हे तर पुरेसे खाद्य द्यावे लागते,” असे त्यांनी सांगितले.
मोनिका शेरगिल यांनी नेटफ्लिक्सने विशेषत: गेमिंगमध्ये प्रवेश करून परस्परसंवादी वैशिष्ट्याचा कसा स्वीकार केला आहे हे विशद केले. "खिळवून ठेवणे ही नवीन प्रतिबद्धता आहे. आणि वैयक्तिकरण प्रत्येक मोठ्या गोष्टीला पुढे जाण्यास मदत करते," त्या म्हणाल्या.
महान कथांचा कसा शोध घेतला जातो, असा प्रश्नही रोहित जैन यांनी उपस्थित केला. गौरव बॅनर्जी यांनी त्यावर उत्तर देताना सांगितले की, कथाकारांना अनेकदा त्यांचा आवाज नैसर्गिकपणे सापडतो. "जग बदलत आहे. भुवन बामचेच उदाहरण घ्या, त्याला त्याचा क्षण, त्याचा आवाज सापडला आहे. आपल्याला फक्त तो नेमका क्षण ओळखायचा असतो आणि त्याच्याशी वेगवेगळे प्रयोग करायचे असतात," ते म्हणाले.
मोनिका शेरगिल यांनी भारताच्या सर्जनशील परिदृष्याच्या कधीही न आजमावल्या गेलेल्या क्षमतेकडे लक्ष वेधत चर्चेचा समारोप केला. "आपण भारताच्या क्षमतेचा पुरेसा शोध घेतला नाही. येथील मानवी भांडवल विलक्षण आहे. विशिष्ट हेतूचलित एआय, समृद्ध कथाकथनासह, दीर्घकाळ टिकणारे मूल्य निर्माण करू शकते," त्या म्हणाल्या.
परिसंवादाची आशावाद, तंत्रज्ञान, परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे कल्पनाशक्ती, तल्लीनता आणि भारतामध्ये असलेली अमर्याद सर्जनशीलता या सूत्रापाशी येऊन सांगता झाली.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/M.Ganoo/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126739)
| Visitor Counter:
12