केंद्रीय लोकसेवा आयोग
सुजाता चतुर्वेदी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणून स्वीकारला पदभार
Posted On:
01 MAY 2025 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2025
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या क्रीडा विभागाच्या माजी सचिव सुजाता चतुर्वेदी यांनी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे ज्येष्ठ सदस्य लेफ्टनंट जनरल राज शुक्ला (निवृत्त) यांनी त्यांना ही शपथ दिली.
सुजाता चतुर्वेदी यांनी नागपूर विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्या लोकप्रशासनात एम.फिल आणि रशियन भाषेत पदविका धारक आहेत.

चतुर्वेदी या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1989 च्या तुकडीतील असून त्यांना बिहार केडर देण्यात आले होते. त्यांना या केडर बरोबरच भारत सरकारमध्ये तीन दशकांहून अधिक काळाचा प्रशासकीय अनुभव आहे. राज्यात, त्यांनी वित्त विभागाच्या प्रधान सचिव, वाणिज्यिक कर आयुक्त, वित्त विभागाच्या सचिव, शहरी विकास विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. केंद्रात, त्यांनी युवा व्यवहार आणि क्रीडा सचिव, डीओपीटीच्या अतिरिक्त सचिव आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणात प्रादेशिक उपमहासंचालक म्हणून काम केले. चतुर्वेदी यांनी क्रीडा विभागाच्या सचिव असताना देशातील क्रीडा विकासासाठी अनेक उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. काही प्रमुख उपक्रमांपैकी वार्षिक खेलो इंडिया गेम्स स्पर्धांचे आयोजन, फिडे बुद्धिबळ ऑलिंपियाड, फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वचषक, राष्ट्रीय क्रीडा भांडार प्रणालीची अंमलबजावणी, मानक क्रीडा सुविधांचे देशव्यापी मॅपिंग आणि देशाच्या उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी लढ्याला बळकटी देण्यासाठी उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी विधेयक लागू करणे हे उपक्रम आहेत.
चतुर्वेदी या महाराष्ट्र राज्यातील असून हिंदी, इंग्रजी, उर्दू, रशियन आणि मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.
* * *
NM/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125879)
Visitor Counter : 9