संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
01 MAY 2025 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2025
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी 01 मे 2025 रोजी नवी दिल्ली इथल्या एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयात एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख (सीआयएससी) पदाचा कार्यभार स्वीकारला. 30 एप्रिल 2025 रोजी लेफ्टनंट जनरल जे.पी. मॅथ्यू या पदावरुन सेवानिवृत्त झाल्यामुळे आशुतोष दीक्षित यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी साउथ ब्लॉकच्या प्रांगणात गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला.
4HHB.JPG)
चार दशकांच्या प्रदीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्दीत एअर मार्शल दीक्षित यांनी अनेक कमांड, कर्मचारी आणि प्रशिक्षक पदांच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, त्यांच्या सेवेसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवापदक, विशिष्ट सेवापदक आणि वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
सीआयएससी म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, एअर मार्शल आशुतोष दीक्षित मध्य हवाई दलाच्या प्रमुखपदी कार्यरत होते. त्यांनी उत्तर भारत आणि मध्य क्षेत्रात मोहिमेअंतर्गत तत्परता वाढवण्यावर आणि इतर सेवांशी समन्वय साधण्यावर लक्ष केंद्रित केले.
एअर मार्शल आशुतोष दीक्षित 06 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेनेच्या लढाऊ पथकात नियुक्त झाले. ते खडकवासला इथली राष्ट्रीय संरक्षण अकादमी; बांगलादेशातले संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय यांचे माजी विद्यार्थी आहेत. ते प्रशिक्षित उड्डाण प्रशिक्षक आणि प्रायोगिक चाचणी वैमानिक असून, त्यांना मिराज-2000, मिग-21 आणि जग्वारसह 20 हून अधिक प्रकारच्या विमानांवर 3,300 तासांहून अधिक उड्डाणांचा अनुभव आहे.

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी दक्षिण क्षेत्रातील एका प्रमुख लढाऊ प्रशिक्षण तळाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली तो तळ कमांडमधील सर्वोत्कृष्ट तळ ठरला. एअर स्टाफ रीक्वायर विभागाचे संचालक म्हणून त्यांनी मध्यम बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या चाचण्यांच्या नियोजन आणि संचालनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
* * *
N.Chitale/N.Chitre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125789)
Visitor Counter : 11